
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला, या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आणि संघाने विजयी सुरुवात केली आहे. या विजयासह भारताच्या संघाने मालिकेमध्ये देखील 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम, भारतीय संघाने शानदार गोलंदाजी केली आणि श्रीलंकेला मजबूत धावसंख्या उभारण्यापासून रोखले. त्यानंतर, भारतीय गोलंदाजांनी त्यांची ताकद दाखवून विजय मिळवला. भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ६ बाद १२१ धावा केल्या. सलामीवीर विश्मी गुणरत्नेने ४३ चेंडूत ३९ धावा केल्या, तर चामारी अटापट्टूने १२ चेंडूत १५ धावा केल्या. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली आणि संघ त्यातून सावरू शकला नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना हसिनी परेराने २३ चेंडूत २० धावा केल्या, तर हर्षिता समरविक्रमाने २३ चेंडूत २१ धावा केल्या. याशिवाय नीलक्षिका सिल्वाने ८ धावा आणि कविशा दिलहारीने ६ धावा केल्या.
१२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताची सुरुवात चांगली झाली नाही, शेफाली वर्मा ५ चेंडूत ९ धावांवर बाद झाली. जेमिमा रॉड्रिग्ज कालच्या सामन्यामध्ये कमालीच्या लयीमध्ये दिसली. तिने कालचा सामना तिच्या खेळीने श्रीलंकेपासून दूर नेला आणि भारताच्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. भारताच्या संघाने पहिला विकेट गमावल्यानंतर तथापि, स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी नंतर जबाबदारी सांभाळली. त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली.
Game. Set. Done 💪 A convincing victory in Vizag and #TeamIndia have taken a 1️⃣ – 0️⃣ lead in the series 🙌 Scorecard ▶️ https://t.co/T8EskKzzzW#INDvSL | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/MFBSTi1D84 — BCCI Women (@BCCIWomen) December 21, 2025
मानधना हिने २५ चेंडूत २५ धावा केल्या, तर जेमिमा रॉड्रिग्ज हिने ४४ चेंडूत १० चौकारांसह नाबाद ६९ धावा केल्या. भारताने १४.४ षटकांत १२२/२ अशी धावसंख्या उभारून सामना जिंकला. भारताच्या जवळजवळ सर्व गोलंदाजांनी टप्प्याटप्प्याने विकेट्स घेतल्या. क्रांती गौड, दीप्ती शर्मा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली, तर श्रीलंकेचे तीन फलंदाज धावबाद झाले. श्रीलंकेकडून काव्या कविंदी आणि इनोका रामावीरानेही प्रत्येकी एक विकेट घेतली.