India and England 2nd Test: Black stripes on players from both teams in the second Test match? A big reason has come to light..
India and England 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. सामन्यापूर्वी इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तर भारत प्रथम फलंदाजी करत आहे. या कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंड संघाचे खेळाडू पहिल्या दिवशी काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर दिसून आले आहेत. यामागील कारण देखील आता समोर आले आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू वेन लार्किन यांच्या निधनाबद्दल काळ्या पट्ट्या बांधून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
वेन लार्किन हे इंग्लंडचे क्रिकेटपटू होते. त्यांनी १९७९ ते १९९१ पर्यंत इंग्लंडसाठी १३ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १९९० मध्ये त्यांनी सबिना पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्ध विजयी धाव घेत संघाला विजय मिळवून दिला होता. वेन लार्किन यांचे २८ जून रोजी निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. या दरम्यान खेळाडूंनी एक मिनिट मौनही पाळले होते.
हेही वाचा : ऋषभ पंत सुसाट! ICC Test Rankings मध्ये घेतली मोठी झेप; जो रूट पहिल्या स्थानावर कायम..
भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी अहमदाबाद विमान अपघातातील बळी, डेव्हिड लॉरेन्स आणि दिलीप दोशी यांच्या स्मरणार्थ २० ते २४ जून दरम्यान लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या दिवशी काळ्या पट्ट्या बांधून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.
२० जून १९७९ रोजी मँचेस्टर येथे खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात त्याने न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तर इंग्लंडचा खेळाडू म्हणून त्याने शेवटचा सामना (एकदिवसीय सामना) १० जानेवारी १९९१ रोजी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. यादरम्यान लार्किनने १३ कसोटी सामने खेळले होते, ज्यामध्ये ४९३ धावा आणि २५ एकदिवसीय सामन्यात ५९१ धावा केल्या होत्या.
हेही वाचा : Captain cool trademark : ‘कॅप्टन कूल’ नोंदणीमागे MSD चा मोठा प्लॅन; धोनीला मिळणार ‘हे’ खास फायदे
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करूण नायर, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप