महेंद्र सिंग धोनी(फोटो-सोशल मीडिया)
MSD captain cool trademark : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे क्रीडा जगतात मोठे चाहते आहेत. त्याची नेहमीच चर्चा होत असते. आता धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला जगभरात ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखले जाते. आता माही या नावाचा कायदेशीररित्या हक्कदार बनला आहे. भारताचा माजी अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १६ जून रोजी त्याच्या टोपणनावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला होता. धोनीने ‘कॅप्टन कूल’ साठी हा अर्ज दाखल केला होता. महेंद्रसिंग धोनीला कॅप्टन कूल असे म्हटले जाते, यामागे कारण म्हणजे तो सामन्यादरम्यान कोणत्याही परिस्थितीत शांत दिसून येतो.
महेंद्रसिंग धोनीला त्याच्या शांत स्वभावामुळे आणि तीक्ष्ण मनामुळे कॅप्टन कूल अशा संबोधन्यात येते. त्यानंतर धोनीकडून या नावाला एक नवीन ओळख देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अशा परिस्थितीत, आता अनेकांना प्रश्न पडू लागला आहे की, धोनीला याचा नेमका काय फायदा होणार? तर धोनीला नेमके काय फायदे होणार हेत ते आपण जाणून घेऊया.
धोनीकडून हा ट्रेडमार्क वर्ग ४१ अंतर्गत नोंदणीकृत करण्यात आला होता. तो खेळ, कोचिंग सेवा, प्रशिक्षण आणि प्रशिक्षण सुविधांसारख्या गोष्टींशी संबंधित आहे. एकूणच, आता इतर कोणीही व्यक्ती हे नाव व्यावसायिकरित्या वापरू शकणार नाही. अशा परिस्थितीत, धोनीच्या ब्रँड व्हॅल्यूला अधिक बळकटी मिळणार आहे.
आता धोनीने या ट्रेडमार्कद्वारे त्याच्या ओळखीला आणि या नावाला कायदेशीरीत्या संरक्षण दिले आहे. त्यानंतर इतर कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही संस्था या नावाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करू शकणार नाही. एकूणच, आता हे नाव व्यावसायिकरित्या वापरले जाणार नाही. अशा परिस्थितीत, आता धोनीच्या ब्रँडला खूप बळकटी मिळणार आहे.
हेही वाचा : India and England 2nd Test : इंग्लंडने जिंकला टॉस, प्रथम करणार गोलंदाजी; टिम इंडिया पहिल्या विजयासाठी सज्ज..
या खटल्याची देखरेख करणाऱ्या धोनीच्या वकील असणाऱ्या मानसी अग्रवाल यांनी सांगितले की, “धोनीच्या वैयक्तिक ब्रँडिंगचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हे पाऊल टाकण्यात आले आहे. तथापि, त्याच्या अर्जानंतर, एक आक्षेप देखील उपस्थित केला गेला होता, ज्यामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला होता की, हा ट्रेडमार्क आधीच नोंदणीकृत आहे.”
त्याच वेळी, धोनीकडून असा युक्तिवाद करण्यात आला होता की, हे टोपणनाव वर्षानुवर्षे त्याच्या ओळखीचा एक भाग असून त्यानंतर आक्षेप घेणाऱ्याची याचिका फेटाळण्यात आली होती.