ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
ICC Ranking : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सांमन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळवला जात आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कसोटी सामन्यापूर्वी आयसीसीकडून खेळाडूंची रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. आयसीसीने बुधवारी नवीन रँकिंग जाहीर केली आहे. या ताज्या फलंदाजी क्रमवारीत भारताचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने मोठे झेप घेतली आहे. पंत एका स्थानाने वर सरकला आहे.
ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही डावात शतके ठोकल्यानंतर त्याच्या रँकिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या डावात १३४ आणि दुसऱ्या डावात ११८ धावांची खेळी केली होती. या दोन शतकांसह, पंतने कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग पॉइंट गाठले आहेत. तो सध्या ८०१ गुणांसह सहाव्या स्थानावर पोहचला आहे. तो अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या जो रूटपेक्षा केवळ ८८ गुणांनी पिछाडीवर आहे. पंतने याआधी जुलै २०२२ मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचवे रँकिंग गाठले होते.
हेही वाचा : Captain cool trademark : ‘कॅप्टन कूल’ नोंदणीमागे MSD चा मोठा प्लॅन; धोनीला मिळणार ‘हे’ खास फायदे
भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल चौथ्या स्थानावर कायम आहे. फलंदाजांच्या यादीमध्ये तो अव्वल भारतीय खेळाडू आहे. कर्णधार शुभमन गिल एका स्थानाने घसरून २१ व्या स्थानावर पोहचला आहे. भारताविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटीत २८ आणि नाबाद ५३ धावा काढणारा रूट दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडचा हॅरी ब्रूकपेक्षा १५ गुणांनी पुढे आहे.तर भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात १४९ धावा काढून इंग्लंडला विजय मिळवून देणारा सलामीवीर बेन डकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम आठव्या स्थानावर विराजमान आहे.
Career-high marks for a couple of centurions in the #ENGvIND Test series.https://t.co/8VqTWrxpSC
— ICC (@ICC) July 2, 2025
भारताच्या वेगवान गोलंदाजीच्याआक्रमणाचा कणा असणारा जसप्रीत बुमराह ९०७ रेटिंग गुणांसह गोलंदाजी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने पाच बळी टिपले होते. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या स्थानावर आहे. जोश हेझलवूड एका स्थानाने पुढे सरकला असून तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज नोमान अलीला मागे टाकले आहे. दरम्यान, भारताचा रवींद्र जडेजा देखील कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीममध्ये अव्वल स्थानावर कायम आहे.