केपटाऊन– टि-२० महिला विश्वचषक स्पर्धेत (Women World cup) भारताने (India) कट्टर पारंपरिक स्पर्धक पाकिस्तानला (Pakistan) १ ओव्हर आणि ७ गडी राखून शानदार विजय मिळवत धूळ चारली. कालचा (रविवारी) भारत-पाक सामना हायहोल्टेज होता, त्यामुळं हा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमीनी मोठी गर्दी केली होती. नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली. आणि भारताला विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य दिले. कर्णधार बिस्माह मारुफने (Bismah Maroof) एक बाजू लावून धरत शानदार अर्धशतक झळकावले. ४५ चेंडूत ५० धावा करत खेळपट्टीवर टिकून आहे. तिला आयशा नसीम ३३ धावा करून साथ देत आहे. पाकिस्तानने 13 षटकात 4 विकेट गमावत 74 धावा केल्या आहेत. कर्णधार बिस्माह मारूफ आणि आयशा नसीम क्रीजवर आहेत. सिद्रा अमीन 11 धावा करून बाद झाली. त्याला राधा यादवने यष्टिरक्षक ऋचा घोषच्या हाती झेलबाद केले. राधाची ही दुसरी विकेट आहे. तिने सलामीवीर जवेरिया खानला (8 धावा) याच पद्धतीने बाद केले. दरम्यान, पाकने भारताला विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य दिले.
भारताची विश्वासक सुरुवात…
दरम्यान, १५० धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या भारताने आश्वासक सुरुवात केली. शफाली वर्माने आक्रमक खेळी करताना भारताला चांगली सुरुवात करुन दिली. भारताच्या तीन विकेट हळूहळू पडत गेल्या. ३८ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ५३ धावांची खेळी करणारी जेमिमा सामनावीर ठरली. तिने रिचासाबत चौथ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली. सामनावीर जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद ५३) आणि रिचा घोषने (नाबाद ३१) अभेद्य अर्धशतकी भागीदारीच्या बळावर भारतीय संघाला रविवारी महिलांच्या टी-२० विश्वचषकात मोठा विजय मिळवून दिला.
जेमिमा व रिचाची विजयी भागिदारी…
भारतीय संघाने ऋचा घोष आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर 19व्या षटकात तीन विकेट्स राखून मजल मारली. जेमिमा रॉड्रिग्जचे (३८ चेंडूंत नाबाद ५३) अर्धशतक आणि रिचा घोष (२० चेंडूंत नाबाद ३१) आक्रमक खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सात गडी आणि सहा चेंडू राखून विजय नोंदवला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयसीसी महिला टी – 20 विश्वचषक स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. विजयी खेळी साकारणाऱ्या जेमिमा सामनावीर ठरली. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पाकिस्तानवरचा हा 5 वा विजय आहे. एकूण विक्रम पाहता भारताचा पाकिस्तानवर 11वा विजय आहे. भारताचा दुसरा सामना बुधवारी विंडीजशी होणार आहे.