
Champions Trophy 2025: India finally set New Zealand a target of 250 runs
दुबई : दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना खेळवला जात आहे. भारताने श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडसमोर 250 आव्हान ठेवले आहे. भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप स्टेजमधील हा शेवटचा सामना आहे. भारताने मागील दोन्ही सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. तर न्यूझीलंड संघाने देखील आपल्या दमदार खेळाच्या जोरावर उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. आजच्या सामन्यात न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत भारताला 300 धावांच्या आत रोखलं आहे. न्यूझीलंडकडून मॅट हेनरीने 5 विकेट्स घेतल्या आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्यास बोलविले. टीम इंडियाने पहिल्या 10 षटकात 3 विकेट गमावून केवळ 37 धावा केल्या होत्या. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल बाद झाला आहे. गिल केवळ 2 धावा करू शकला. त्याला मॅट हेनरीने माघारी पाठवले. त्यापाठोपाठ लयीत दिसणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात झेल देऊन बसला. त्याने 17 चेंडूत 15 धावा केल्या. गिल नंतर आलेल्या विराट कोहलीलाही फार काही करता आले नाही. 300 व्या एकदिवसीय सामन्यात कोहली धावा करेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, ग्लेन फिलिप्सने किंग कोहलीचा अप्रतिम झेल पकडला आणि कोहलीला 11 धावांवरच तंबूत परत जावं लागलं.
हेही वाचा : IND vs NZ : 300 व्या वनडेमध्ये ‘किंग कोहली’ फेल; ग्लेन फिलिप्सचा हवेत सुर मारत अप्रतिम झेल; पाहा व्हिडिओ
त्यांतर आलेल्या श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अक्षर पटेल 42 धावांवर असताना रचीन रवींद्रच्या गोलंदाजीवर यंगकडे झेल देऊन पटेल बाद झाला. श्रेयस अय्यरने आपला फॉर्म कायम राखत एक बाजू लावून धरली. श्रेयस अय्यर 98 चेंडूमध्ये 79 धावा करून माघारी परतला आहे. त्याला विल्यम पीटर ओ’रुर्कने माघारी धाडलं. भारतीय संघाला के एल राहुलच्या रुपाने सहावा धक्का बसला आहे.
केएल राहुल २३ धावांवर बाद झाला. ३७ षटकापर्यंत भारताचा निम्मा संघ बाद झाला होता. रवींद्र जडेजाही फार काळ तग धरू शकला नाही. तो 16 धावांवर असताना मॅट हेनरीचा शिकार ठरला. हार्दीक पांड्याने जोरदार फटके बाजी करत संघाला संघाला 250 पर्यंत पोहचवलं. त्याने 45 चेंडूमध्ये 45 धावा केल्या. त्यांतर आलेल्या शमीने 5 धावा करून तंबूचा रस्ता पकडला. तर कुलदीप यादव 1 धाव करून नाबाद राहीला. न्यूझीलंडकडून मॅट हेनरीने चमक दाखवत भारताच्या 5 खेळाडूंना माघारी पाठवले. जेमिसन, विल्यम ओ’रुर्क, मिचेल सँटनर आणि रचीन रवींद्र यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा
विल यंग, डेरेल मिचेल, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओ’रोर्क