Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: बांग्लादेशला ‘हुतुतू’ समजेना! भारतीय कबड्डी संघाचा दणदणीत विजय

Asian Games 2026: स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत आपली छाप सोडली असून ग्रुप स्टेजमधील हा भारताचा सलग तिसरा विजय ठरला आहे. भारताने स्पर्धेची सुरुवात जपानविरुद्धच्या दणदणीत विजयाने केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 23, 2026 | 02:57 PM
asian games 2026

asian games 2026

Follow Us
Follow Us:
  • भारतीय कबड्डी संघाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश
  • एशियन गेम्समध्ये भारताने केला बांग्लादेशचा पराभव 
  • सुनील कुमारच्या नेतृत्वात मिळवला विजय 
Asian Games 2026/Kabaddi: सध्या जपानमध्ये एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. बांग्लादेशचा पराभव करत भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या शानदार कामगिरीसह भारतीय संघाने स्पर्धेतील आपले पदकही निश्चित केले आहे.कर्णधार सुनील कुमारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने बुधवारी टोकाई सिटिजन्स जिम्नेजियम येथे झालेल्या ‘ग्रुप ए’च्या सामन्यात बांगलादेशचा ४८-२५ असा धुव्वा उडवला.

स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत आपली छाप सोडली असून ग्रुप स्टेजमधील हा भारताचा सलग तिसरा विजय ठरला आहे. भारताने स्पर्धेची सुरुवात जपानविरुद्धच्या दणदणीत विजयाने केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण कोरियाचा ६३-३१ असा मोठा पराभव केला. आता बांगलादेशवर मात करत भारताने थाटात सेमीफायनलची तिकीट मिळवले आहे. भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवल्यामुळे कबड्डीतील आणखी एका पदकावर भारताचे नाव कोरले गेले असून, आता सर्व चाहत्यांचे लक्ष सुवर्णपदकाकडे लागले आहे.

Arjun Deshwal and co. seal a thumping 48-25 victory over Bangladesh to keep India’s unbeaten run alive at Aichi-Nagoya 2026! ⚡ Watch the 20th Asian Games Aichi-Nagoya LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #AsianGames #AichiNagoya2026… pic.twitter.com/40yIiOnJrG — Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 23, 2026

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय रेडर्सनी बांगलादेशी डिफेंडर्सची पार दाणादाण उडवली. आक्रमक चढाया करत भारतीय खेळाडूंनी यशस्वी रेड्सद्वारे १८ पॉईंट्स आणि ७ महत्त्वाचे बोनस पॉईंट्स कमावले. बांगलादेशच्या खेळाडूंना भारताच्या मजबूत डीफेन्सला मोडणे अवघड केले. भारताने केलेल्या आक्रमक खेळामुळे बांग्लादेशला गेममध्ये परतणे शक्य झाले नाही. बांगलादेशने एका ‘सुपर टॅकल’द्वारे १ गुण मिळवून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; परंतु भारतीय संघाच्या आक्रमक खेळासमोर त्याचा फारसा प्रभाव पडला नाही.

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये बांगलादेशच्या संघाने काही प्रमाणात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आक्रमक चढाया करत रेडिंगद्वारे ८ पॉईंट्स आणि ८ बोनस पॉईंट्स प्राप्त केले. मात्र, पहिल्या हाफमधील भारताची प्रचंड आघाडी आणि मैदानातील संतुलित रणनीती यांसमोर बांगलादेशचे हे प्रयत्न अपुरे ठरल्याचे दिसून आले.

Web Title: India kabaddi team beat to bangladesh and enter semi finals asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • asian games 2026
  • india vs Bangladesh
  • Kabaddi

संबंधित बातम्या

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
1

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

Asian Games 2026: गर्वाने छाती फुलली! जय मीणाने जिंकले ‘Bronze’; सॉफ्ट टेनिसमध्ये प्रथमच…
2

Asian Games 2026: गर्वाने छाती फुलली! जय मीणाने जिंकले ‘Bronze’; सॉफ्ट टेनिसमध्ये प्रथमच…

Asian games 2026: २८ वर्षांचा दुष्काळ संपला! Mirabai chanu ने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं पदक
3

Asian games 2026: २८ वर्षांचा दुष्काळ संपला! Mirabai chanu ने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं पदक

Asian Games 2026: महिला स्किट शूटिंग टीमने मिळवून दिलं भारताला आठवं मेडल, रायजा-परिनाझची कमाल
4

Asian Games 2026: महिला स्किट शूटिंग टीमने मिळवून दिलं भारताला आठवं मेडल, रायजा-परिनाझची कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.