फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध झिम्बाम्ब्वे – भारत विरुद्ध झिम्बाम्ब्वे (India vs Zimbabwe) यांच्यामध्ये मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मागील सामन्यांचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये झिम्बाम्ब्वेच्या संघाने विजय मिळवला होता. तर पुढील सामन्यांमध्ये टीम इंडीयाने (Team India) सलग दोन सामने जिंकून आघाडी घेतली. पहिला सामन्यांमध्ये संघाचे लक्ष्य पूर्ण न झाल्यामुळे झिम्बाम्ब्वेच्या संघाने 13 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) या पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेतली.
दुसऱ्या सामन्याचा विचार केला तर, भारताच्या मजबूत फलंदाजीने भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकून भारताच्या संघाला मजबूत उभे केले. एवढेच नव्हे तर त्याच्यासोबत ऋतुराज गायकवाडने सुद्धा अर्धशतक पूर्ण करून त्याला साथ दिली.
भारताच्या संघाने दूसऱ्या सामन्यामध्ये 100 धावांनी विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडीयाने 23 धावांनी विजय मिळवला. 13 जुलै रोजी भारत झिम्बाम्ब्वे सामना मालिकेतील चौथा सामना असणार आहे. हा सामना भारतासाठी विशेषतः महत्त्वाचा असणार आहे. कारण भारताने सध्या मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. भारताने पुढील म्हणजेच 13 जुलै रोजी आयोजित केलेल्या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यास भारत ही झिम्बाम्ब्वे विरुद्धची मालिका नावावर करेल. त्यामुळे भारतासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. त्याचबरोबर विश्वचषकामध्ये सामील असलेले संजू सॅमसन, शिवम दुबे या खेळाडूंनी सुद्धा भारतीय युवा खेळाडूंच्या संघात सामील झाले आहेत. त्यामुळे भारताचा संघ आणखी मजबूत झाला आहे.
भारत विरुद्ध झिम्बाम्ब्वे सामना 13 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सामना झिम्बाम्ब्वे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाणार आहे. शुभमन गीलच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ झिम्बाम्ब्वेविरुद्ध चौथा सामना खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 4.30 वाजता खेळवला जाणार आहे. सामन्याच्या अर्ध्या तासा आधी नाणेफेक होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण Sony Liv App वर उपलब्ध आहे.