
सुपर ओव्हरमध्ये भारताचा दारुण पराभव! (Photo Credit - X)
बांगलादेशची धमाकेदार फलंदाजी
बांगलादेश अ ने हबिबुर रहमानच्या अर्धशतकाच्या जोरावर आणि एसएम महरोबच्या तुफानी खेळीमुळे (१८ चेंडूंत १ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ४८ धावा) २० षटकांत ६ विकेट गमावत १९४ धावा केल्या.
कर्णधाराच्या चुकीमुळे सामना झाला टाय
१९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली, पण अखेरीस भारताने लागोपाठ विकेट गमावल्या. भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ४ धावांची आवश्यकता होती. हर्ष दुबेने शॉट मारला आणि भारताने २ धावा चोरण्याचा प्रयत्न केला. बांगलादेशचा विजय निश्चित दिसत होता, पण कर्णधार आणि यष्टीरक्षक अकबर अलीने धावबाद करण्याच्या प्रयत्नात चेंडू स्टंप्सच्या दिशेने फेकला.
A close encounter in the semi-final, but it is Bangladesh A who win the super over. Scorecard ▶️ https://t.co/WCP3ww9Ocy #RisingStarsAsiaCup pic.twitter.com/c6R8aSFIki — BCCI (@BCCI) November 21, 2025
चेंडू स्टंप्सला लागला नाही आणि ऑफ साईडकडे गेला, ज्यामुळे हर्ष आणि नेहल वढेरा यांनी अतिरिक्त ३ धावा घेतल्या. अशाप्रकारे, २० षटके पूर्ण झाल्यावर भारताचा स्कोअरही ६ बाद १९४ धावा झाला आणि बांगलादेशच्या कर्णधाराच्या चुकीमुळे सामना टाय झाला, ज्यामुळे सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये गेला.
भारताचा सुपर ओव्हरमध्ये निराशाजनक खेळ
भारताला फायनलमध्ये पोहोचण्याची सुवर्णसंधी होती, पण सुपर ओव्हरमध्ये भारताचा खेळ अत्यंत निराशाजनक राहिला. सुपर ओव्हरमध्ये भारताकडून कर्णधार जितेश शर्मा आणि रमनदीप सिंह फलंदाजीला आले. स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीला न पाठवण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आला. रिपोन गोलंदाजीसाठी आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर जितेशला बोल्ड केले. त्यानंतर आलेल्या आशुतोष शर्माला दुसऱ्या चेंडूवर झेलबाद केले. अशा प्रकारे भारताला सुपर ओव्हरमधील सहा चेंडू खेळताही आले नाहीत आणि संघाला एकही धाव करता आली नाही.
बांगलादेशचा विजय
बांगलादेशला विजयासाठी फक्त १ धावेची गरज होती. यासिर अलीने मोठा शॉट खेळला आणि रमनदीपने त्याचा झेल घेतला (बांगलादेशने १ विकेट गमावली). यानंतर कर्णधार अकबर अली फलंदाजीला उतरला, पण भारताच्या सुयश शर्माने व्हाईड बॉल टाकला आणि बांगलादेश अ संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.