फोटो सौजन्य : Facebook
२९ मे पासुन उझबेगिस्तान येथे फरगाना या ठिकाणी सध्या वाॅलीबालच्या स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेमध्ये भारताचा संघ सुद्धा सामील झाला आहे. CAVA मेन्स नेशन्स लीग २०२५ ही स्पर्धा पाकस्ताममध्ये आयोजित केली जाणार होती, पण सुरक्षेच्या कारणामुळे ही स्पर्धा उझबेगिस्तान हलवण्यात आली आहे. भारताच्या संघाने जर स्पर्धा पाकिस्तानला झाली असती तर भारताच्या संघाने माघार घेण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन हे उझबेगिस्तान करण्यात आले आहे.
भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने CAVA मेन्स नेशन्स लीग २०२५ या स्पर्धेच्या सेकेंड राउंडमध्ये त्यांच्या क्रॉसओवर सामन्यामध्ये पाकिस्तानला हरवले आहे. पाकिस्तानचा संघ हा गट अ मध्ये पहिल्या स्थानावर होता. भारताच्या संघाने सुरुवातीपासुन चांगला खेळ दाखवला आहे. भारताच्या संघाने पाकिस्तानला एकतर्फी पराभुत करुन दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या संघाने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांना १ तास ३० मिनिटांत २५-१५, २५-१९, २५-२३ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना झाल्यानंतर जेव्हा भारत आणि पाकिस्तान वादानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी घोषणा केली होती की पाकिस्तान युद्धामध्ये विजयी झाला आहे, पण हे खोटे होते हे सर्वांनाच माहिती होते. आता सोशल मिडीयावर पाकिस्तानी चाहत्यांनी पाकिस्तानचा संघ CAVA मेन्स नेशन्स लीग २०२५ मध्ये भारताविरुद्ध विजय मिळवला अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. याच्या प्रतित्युरात The Khel India ने त्याच्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यांनी लिहीले आहे की, पाकिस्तानच्या लोकांसाठी पुरावा, सुदैवाने सामना थेट प्रक्षेपित झाला असता, अन्यथा आपल्या शेजाऱ्यांनीही येथे विजय मिळवला असता! ही पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
PROOF FOR THE PEOPLE OF PAKISTAN 🎥
Thankfully match was broadcasted live, or our neighbours would have claimed victory here too!pic.twitter.com/SS9jbEwkHO https://t.co/z3cCCoVseb
— The Khel India (@TheKhelIndia) June 2, 2025
भारताचा पुढचा सामना हा ३ जून रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना कझाकस्तानशी होईल तर पाकिस्तानचा सामना त्याच दिवशी इराणशी होणार आहे. दिवसाच्या आधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये इराणने कझाकस्तानचा ३-० (२५-१५, ३०-२८, २५-१५) असा आरामात पराभव केला तर किर्गिस्तानने एका वेळी ०-२ असा पिछाडीवर असतानाही पुनरागमन करत तुर्कमेनिस्तानचा ३-२ (१९-२५, २१-२५, २५-१५, २५-२१, १५-१३) असा पराभव केला.