फोटो सौजन्य : IndianPremierLeague
RCB vs PBKS हेड टू हेड आकडेवारी : श्रेयस अय्यर आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये आज अमानासमना होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2025 चे जेतेपद कोणाला मिळणार हे आज समजणार आहे. आयपीएल 2025 चा महामुकाबला म्हणजेच अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय चाहते फारच उत्सुक आहेत. आज दोन असे संघ फायनलचा सामना खेळणार आहेत, जे संघ आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही त्यामुळे आज कोण बाजी मारणार हे पाहणे मनोरंजक ठरेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा या सीझनमध्ये दमदार फॉर्ममध्ये पाहायला मिळाला आहे त्याने संघासाठी कमालीचा खेळ दाखवला आहे. रॉयल चॅलेंजेस बंगळुरू त्यांचा १८ वर्षाचा दुष्काळ संपवणार याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. तर पंजाब किंग्सने देखील १७ वर्षांमध्ये आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही आज श्रेयस अय्यरने मागील वर्षामध्ये कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद मिळवून दिले होते या वर्षी त्याने पंजाब किंग्सच्या संघाला त्याच्या दमदार नेतृत्वाखाली फायनलमध्ये नेले आहे. याआधी दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारी काय आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघाबद्दल बोलायचं झालं तर हे दोन संघ आयपीएलच्या इतिहासामध्ये ३६ वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये १८ सामन्यांमध्ये पंजाबच्या संघाने विजय मिळवला आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने देखील १८ सामने जिंकले आहेत आता आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे मनोरंजक ठरेल.
दोन्ही संघांमधील शेवटच्या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर पंजाब आणि बंगळुरू या दोन संघांमध्ये क्वालिफायर १ मध्ये सामना झाला होता. या सामन्यात पंजाबच्या संघाने फारच निराशाजनक कामगिरी केली होती. बंगळुरूच्या संघाने पंजाबच्या संघाला १०१ धावांवर सर्वबाद केले होते आणि हे लक्ष्य सहज पार करून फायनलमध्ये स्थान पक्के केले होते.
पंजाबच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभूत करून फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. या सीझनमध्ये पॉइंट टेबलमध्ये पंजाब किंग्सचा संघ हा पहिल्या स्थानावर होता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाने संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे. पंजाब किंग्सच्या संघासाठी मागील सामन्यांमध्ये ८७ धावांची नाबाद खेळी खेळली होती.