फोटो सौजन्य – X (World Championship Of Legends)
इंडिया चॅम्पियन्सना वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे युवराज सिंगच्या संघाला अद्याप पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडता आलेले नाही. इंडिया चॅम्पियन्सने स्पर्धेत आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत आणि दोन्हीमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पहिला सामना रद्द करण्यात आला. 26 जुलै रोजी ऑस्ट्रेलियासोबत खेळलेल्या सामन्यात इंडिया चॅम्पियन्सना पराभवाचा सामना करावा लागला.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या ११ व्या सामन्यात वेस्ट इंडिजला हरवून पाकिस्तानने सलग तिसरा सामना जिंकलाच नाही तर पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळवून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यताही वाढवली आहे. या विजयानंतर पाकिस्तानचे ४ सामन्यांत ७ गुण आहेत. भारताविरुद्धचा त्यांचा सामना रद्द करण्यात आला. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची विजयी मालिकाही खंडित झाली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर त्यांचे ४ सामन्यांत ६ गुण आहेत. टीम इंडिया पहिल्या विजयासाठी उत्सुक आहे.
गतविजेत्या भारताने शनिवारी, २६ जुलै रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा सामना खेळला, जिथे त्यांना ४ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना रद्द झाल्यानंतर भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. ऑस्ट्रेलियापूर्वी, युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला होता. जर भारताला सेमीफायनलचे तिकीट मिळवायचे असेल तर त्यांना उर्वरित दोन सामने जिंकून टॉप-४ मध्ये स्थान मिळवावे लागेल. या स्पर्धेत फक्त ६ संघ सहभागी होत आहेत.
सध्या पाकिस्तान चॅम्पियन्स पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानने ४ सामने खेळले आहेत, त्यापैकी ३ सामने जिंकले आहेत, तर एक सामना रद्द झाला आहे. सध्या पाकिस्तानचे ७ गुण आहेत, तर दक्षिण आफ्रिका ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि ऑस्ट्रेलिया ५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय, वेस्ट इंडिज २ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे आणि इंडिया चॅम्पियन्स सहाव्या स्थानावर आहे.
कालच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने काही कॅच देखील सोडले त्याचबरोबर फिल्डिंग देखील चांगली केली नाही. गोलंदाजीमध्ये हरभजन सिंग आणि पियुष चावला आणि विकेट्स घेतल्यानंतर भारताच्या संघ लवकर विकेट घेण्यात अपयशी ठरला.