फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये काल चौथा दिवस पार पडला या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्याच ओवरमध्ये दोन विकेट्स गमावले होते यावेळी भारताचा एकही रण झाला नव्हता. पहिल्या एक ओव्हरमध्ये 0 धावा असताना भारताच्या संघाने यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन या दोघांचा विकेट गमावला होता आणि भारताचा संघ मोठ्या अडचणीत होता. टीम इंडिया आज सामनात पराभूत होणार अशी क्रिकेटच्या चाहत्यांनी मानले होते. पण भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि के एल राहुल हे दोघेही टीम इंडियासाठी दगडासारखे मैदानावर उभे राहिले आणि दोन विकेट्स कमावल्यानंतर भारताच्या संघाने चौथ्या दिनाच्या समाप्तीपर्यंत एकही विकेट्स गमावलेला नाही.
मालिकेमध्ये टिकून राहण्यासाठी भारताच्या संघाला हा सामना जिंकणे कठीण आहे पण ड्रॉ करणे भारताच्या हातात आहे त्यामुळे आत्ता हे दोन्ही फलंदाज पाचव्या दिनी कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारताच्या संघाने आणि इंग्लंडच्या संघाने चौथा दिनी दोन्ही संघांनी कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यांमध्ये आणखी एकदा या सामन्यात भारताच्या संघाने नाणेफेक गमावले होते आणि भारताच्या नशिबी फलंदाजी आली होती.
Stumps on Day 4 in Manchester! 🏟️
A splendid partnership between Captain Shubman Gill (78*) & KL Rahul (87*) takes #TeamIndia to 174/2 👏👏
A gripping final day of Test cricket awaits ⏳
Scorecard ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#ENGvIND pic.twitter.com/1EMrsu90I3
— BCCI (@BCCI) July 26, 2025
टीम इंडियाने पहिल्या डावामध्ये 358 धावा केल्या होत्या तर इंग्लंडचा संघाने भारताच्या संघाला चांगलाच धुतलं आणि त्यांनी त्यांच्या पहिल्या डावामध्ये 669 धावा केल्या. 669 धावा केल्यानंतर भारताच्या संघाला तिसऱ्या इनिंगची फलंदाजी मिळाली. तिसरा इनिंगमध्ये पहिले ओव्हर क्रिस वोक्स गोलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट्स भारताचे घेतले. क्रिस वोक्सने टीम इंडियाचे दोन्ही विकेट्स घेतल्यानंतर भारताच्या संघाने सामना गमावला असे चित्र पाहायला मिळाले.
पहिल्या सेशनमध्ये दोन विकेट्स केल्यानंतर भारताच्या संघाने त्यानंतर दोन्ही सेशनमध्ये एकही विकेट गमावला नाही. टीम इंडिया साठी सध्या शुभमन गिल आणि के एल राहुल हे दोघे फलंदाजी करत आहेत. शुभमन गिल ज्याने आत्तापर्यंत 78 धावांची खेळी खेळली आहे यामध्ये त्याने दहा चौकार मारले आहेत. त्याचबरोबर त्याने विश्वविक्रम देखील नावावर केला आहे. तर केल राहुलने भारतीय संघासाठी 87 धावांची खेळी खेळली आहे यात त्याने आठ चौकार मारले आहेत. या दोन्ही फलंदाजांनी भारतीय संघाची लाज राखली आणि कालपासून पहिल्या सेशन पासून दोघेही फलंदाजी करत आहेत.
भारताचे संघाला जर हा सामना ड्रॉ करायचा असल्यास भारतीय इंडियानात पाचव्या दिने देखील चांगली फलंदाजी करणे गरजेचे आहे कारण ऋषभ पंत हा आधीपासूनच जखमी असल्यामुळे कदाचित तो फलंदाजीला येऊ शकणार नाही त्यामुळे टीम इंडियाला या दोघांचे खेळणे फार गरजेचे आहे.