फोटो सौजन्य - Star Sports
विश्वचषकाआधी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आजपासून एक दिवसीय तीन सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये आयसीसी एक दिवसीय विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे या विश्वचषकाचा शुभारंभ हा 30 जून पासून होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये एक दिवसीय मालिकेचा आयोजन करण्यात आले आहे ही मालिका भारतामध्येच होणार आहे पहिला सामना हा आज होणार आहे.
हरमनप्रीत कौर नेतृत्वाखाली भारताचा संघ आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. भारताच्या संघाने इंग्लंड दौऱ्यावर इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून मोठा ऐतिहासिक विजय मिळवला होता. आता टीम इंडियाचे लक्ष आहे या मालिकेचा विजयावर असणार आहे विश्वचषका आधी भारताच्या संघाला या मालिकेमध्ये विजय मिळवणे फार गरजेचे आहे. मागील काही मालिकांमध्ये भारताच्या संघाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
क्रीडाप्रेमींसाठी आज मनोरंजनाची मेजवानी! दिवसभरात आज पहायला मिळणार दमदार खेळ, वाचा संपूर्ण वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये होणारा एक दिवसीय मालिकेचा पहिला सामना हा आज म्हणजे 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना पंजाब मधील महाराजा याध्विंद्र सिंग इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना एक वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहेत तर या सामन्याचे अर्ध्या तासात दोन्ही संघाचे कर्णधार हे नाणेफेक साठी तयार राहतील.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा सामन्याचे थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये सामन्याचे थेट प्रक्षेपण प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग ही जिओ हॉटस्टार वर पहायला मिळणार आहे.
Grind Mode: 🔛
The toughest challenge needs the hardest yards, & the Women in Blue are leaving no stone unturned! 💙💪#INDvAUS, 1st ODI 👉 SUN, 14th SEP, 1 PM on Star Sports & JioHotstar! pic.twitter.com/bjdRAwg2Eh
— Star Sports (@StarSportsIndia) September 13, 2025
स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दिप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चर्नी, क्रांती गौड, रेणुका सिंग.
अॅलिसा हीली (कर्णधार आणि यष्टीरक्षक), फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वोल, बेथ मूनी, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, अॅनाबेल सदरलँड, मेगन शट, जॉर्जिया वेअरहॅम, डार्सी ब्राउन.