फोटो सौजन्य - सोशल मिडिया
सप्टेंबरच्या या सुपर संडेमध्ये आज क्रिकेट प्रेमींसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या आज एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कप आहे भारतीय महिला संघासाठी ही महत्त्वाची मालिका असणार आहे यामध्ये चांगले कामगिरी करणे हे भारतीय संघासाठी नक्कीच विश्वचषकामध्ये फायदेशीर करणारा आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाचा खेळाडूंवर लक्ष ठेवून त्यांच्या अडचणींचा फायदा घेण्याची देखील संधी आहे. आज दिवसभरामध्ये कोणते खेळ पाहायला मिळणार आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये आज आशिया कपचा दुसरा सामना टीम इंडियाचा खेळवला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याची मागील अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. पहलघाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. भारताने पाकिस्तानने पूर्णपणे वगळण्याचे ठरवले होते पण भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याला विरोध केला होता. आशिया कप मध्ये भारताचे संघाने चांगली सुरुवात केली आहे त्यामुळे टीम इंडियाच्या आता पाकिस्तान विरुद्ध होणारा थांबण्यासाठी विशेष लक्ष असणार आहे.
भारताची स्टार जोडी सात्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी हॉंगकॉंग ओपन मध्ये फायनल मध्ये प्रवेश केला आहे सेमी फायनल च्या फेरीमध्ये चायनीज थायपाईच्या दोन्ही खेळाडूंना पराभूत करून भारताचा जोडीने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर पुरुष एकेरी पुरुष स्पर्धेमध्ये देखील लक्ष सेनने जागतिक क्रमवारी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चाउ टेन चेन याला पराभूत करून फायनल मध्ये प्रवेश केला आहे. 2023 नंतर लक्ष सेन हा पहिल्यांदा सामान घेताना दिसणार आहे. सात्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा फायनलचा सामना हा 12.30 मिनिटांनी सुरु होणार आहे, तर लक्ष सेनचा फायनलचा सामना हा 2.30 मिनिटांनी सुरु होणार आहे.
Into the finals of #HongKongOpen2025 🏸🔥
Lakshya Sen edges past 3rd seed Chou Tien Chen 🇹🇼 23-21, 22-20 in a thrilling 56-min battle ⏱️💥He now sets up a title clash against 🇨🇳 Shi Feng! 🇮🇳✨#badminton pic.twitter.com/syGmzj60bU
— BAI Media (@BAI_Media) September 13, 2025
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या t20 मालिकेमध्ये सध्या एक एक अशी बरोबरी आहे आज या मालिकेचा शेवटचा सामना खेळवला जाणार आहे या सामन्यात जो संघ विजय मिळेल तो संघ मालिका जिंकणार आहे. मागील सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती त्यामुळे आता या मालिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे त्यांनी रेकॉर्ड ब्रेक धावसंख्या उभारून दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजांचा धुवावडला होता
भारत विरुद्ध चीन यांच्यामध्ये आज महिला हाॅकी संघाचा फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना आशिया कपचा फायनलचा सामना खेळवला जाणार आहे.