फोटो सौजन्य - सोशल मीडिया
यशस्वी जैस्वालचे अर्धशतक : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना सुरु आहे, आज या सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी भारताला ३४० धावांचे लक्ष्य मिळाले आहे, या धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने धडाकेबाज अर्धशतक झळकावले आहे. चौथ्या डावात ५० धावांचा टप्पा गाठण्यासाठी जयस्वालने १२७ चेंडूंचा सामना केला ज्यात त्याने ७ चौकार मारले. जैस्वालने आपल्या छोट्या कसोटी कारकिर्दीत १४ अर्धशतके झळकावली आहेत, परंतु हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात संथ अर्धशतक आहे.
होय, त्याच मालिकेत त्याने दुसऱ्यांदा सर्वात संथ अर्धशतक झळकावले आहे. आतापर्यत हा लेख लिहिपर्यत टीम इंडियाने चार विकेट्स गमावले आहेत यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि रिषभ पंत हे खेळाडू बाद झाले आहेत. जैस्वाल हा त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. याआधी पर्थ कसोटीत त्याने ५० धावांचा टप्पा गाठण्यासाठी १२३ चेंडूंचा सामना केला होता. मेलबर्नमधील यशस्वी जैस्वालची ही खेळी पाहून चाहत्यांना चेतेश्वर पुजाराची आठवण झाली. मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पुजाराने अशीच खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. गब्बामध्ये पुजाराने जवळपास २०० चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
यशस्वी जैस्वालनेही आपल्या अर्धशतकाच्या जोरावर आणखी अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आर्मी देशांमध्ये दोन्ही डावात ५० पेक्षा जास्त धावा करणारा तो १० वर्षांनंतरचा पहिला फलंदाज ठरला आहे. मुरली विजयने शेवटच्या वेळी २०१४ मध्ये ॲडलेड आणि नॉटिंगहॅममध्ये ही कामगिरी केली होती.
Fifty for Yashasvi Jaiswal. Bro is giving us some hope. Keep going man. pic.twitter.com/FOYDxTPcys
— R A T N I S H (@LoyalSachinFan) December 30, 2024
या अर्धशतकासह यशस्वी जैस्वालने एका वर्षात सर्वाधिक ५० पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. सचिनने २०१० मध्ये १२ वेळा ५० पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळली होती, तर जैस्वालने १२व्यांदा ही कामगिरी केली आहे. १३ वेळा अशी कामगिरी करून वीरेंद्र सेहवाग या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.