फोटो सौजन्य : Indian Football Team
India vs Hong Kong Football Match : काल भारतीय फुटबॉल संघाचा आशियाई कप पात्रता फेरीमध्ये हाँगकाँगशी सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी राहिली. या सामन्यात भारताचे संघाला हॉंगकॉंग विरुद्ध ०-१ असा पराभवाचा सामना करावा लागला हा पराभव भारताचे संघाला अडचणीत टाकणारा आहे. भारताचा गोलकीपर विशाल कैथ गोल लाईनच्या बाहेर आला आणि त्याने सुरक्षितपणे चेंडू क्लिअर करण्याचा प्रयत्न केला परंतु मायकेल उदेबुलुझोरविरुद्ध त्याने फाउल केला तेव्हा पंचांनी हाँगकाँगला पेनल्टी दिली.
२०२७ च्या एएफसी आशियाई कप पात्रता फेरीतील एका महत्त्वाच्या सामन्यात स्टीफन परेराने इंज्युरी टाइममध्ये केलेल्या गोलमुळे भारतीय फुटबॉल संघाला मंगळवारी यजमान हाँगकाँगकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला. यानंतर अनेक भारतीय फुटबाॅल चाहते हे निराश झाले आणि सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. परेराने पेनल्टी मिळवून हाँगकाँगचा विजय निश्चित केला. त्याने कैथच्या उजव्या बाजूने चेंडू गोलमध्ये टाकला.
WTC Final 2025 जिंकणारा संघ रचणार इतिहास! ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोण मारणार बाजी?
इंज्युरी टाइममध्ये झालेल्या फाउलसाठी कैथला पिवळे कार्डही दाखवण्यात आले. त्याआधी, भारताचे प्रशिक्षक मनोलो मार्केझ यांनी अनुभवी स्ट्रायकर सुनील छेत्रीला सुरुवातीच्या अकरा संघातून बाहेर ठेवले. भारतीय संघ सध्या वाईट काळातून जात आहे. अशा परिस्थितीत हा पराभव त्यांच्यासाठी आणखी एका दुःस्वप्नासारखा आहे.
Full-time! A tough one to take for the #BlueTigers.#HKGIND #IndianFootball ⚽️ pic.twitter.com/OBRZKdQhta
— Indian Football Team (@IndianFootball) June 10, 2025
हाँगकाँगपूर्वी भारताला थायलंडविरुद्ध ३-० असा पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षक मार्क्वेझ यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय संघाने अनेक संधी निर्माण केल्या पण त्यांना यश मिळू शकले नाही. ३९ व्या मिनिटाला आशिक कुरियनने एक उत्तम संधी निर्माण केली. भारताने अशा आणखी काही संधी निर्माण केल्या पण गोल करू शकला नाही जो भारतासाठी महागडा ठरला.
या सामन्यात संघाचे प्रशिक्षक मार्क्वेझ यांनी संघाचा स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री याला बेंचवर बसवले, जो टीम इंडियासाठी हानिकारक ठरला. त्याच्या जागी लालिन्जुला छांगटेला संधी मिळाली जी आपली छाप सोडू शकली नाही. भारताचे मिडफील्ड त्रिकूट सुरेश सिंग, ब्रँडन फर्नांडिस आणि अपुइया देखील संघाला यश मिळवून देऊ शकले नाहीत.