फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध आयर्लंड : भारतीय महिला संघाचा काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका पार पडली. यामध्ये भारताच्या संघाने दोन्ही मालिकेमध्ये विजय मिळवला होता. आता आजपासून भारत विरुद्ध आयर्लंड महिला संघामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील तीनही सामने राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. भारतीय महिला संघाच्या या मालिकेत अनुभवी स्टार सलामीवीर स्मृती मानधना कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
भारतीय महिला संघ विरुद्ध आयर्लंड महिला संघ यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये आयर्लंडची कर्णधार गॅबी लुईस हिने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आतापर्यत ११.४५ पर्यत ९ ओव्हरचा खेळ झाला आहे. यामध्ये आयर्लंडच्या संघाने २ विकेट्स गमावून ३४ धावा केल्या आहेत. सारा फोर्ब्सला तैसा साधु हिने बाद केले आहे तर उना रेमंड-होई हिला जेमिमा रॉड्रिक्सने धाव बाद केले आहे. सारा फोर्ब्सने संघासाठी ९ धावा केल्या तर रेमंड-होई हिला हिने ५ धावा केल्या.
𝙍𝙐𝙉-𝙊𝙐𝙏!
Jemimah Rodrigues 🤝 Richa Ghosh
Ireland 2 down.
UPDATES ▶️ https://t.co/bcSIVpjnlo#TeamIndia | #INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/995Koak1ee
— BCCI Women (@BCCIWomen) January 10, 2025
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथील खेळपट्टी आता मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये फलंदाजीसाठी योग्य मानली जात आहे, ज्यामध्ये धावा काढणे खूप सोपे झाले आहे. एकदिवसीयमध्ये, खेळपट्टीला दोन्ही डावात समान उसळी असते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो जेणेकरून लक्ष्याचा सहज पाठलाग करता येईल. येथे प्रथम फलंदाजी करताना एकदिवसीय सामन्यातील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ३२० ते ३२५ धावांच्या दरम्यान दिसली. आतापर्यंत येथे खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानेच सामना जिंकला आहे, त्यामुळे नाणेफेक दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे.
स्पोर्ट्स 18 चॅनलवर चाहते भारत आणि आयर्लंड महिला संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय, मॅचेसचे ऑनलाइन स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर होईल. या एकदिवसीय मालिकेतील तीनही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरू होतील.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी तिच्या शरीराला दुखापत झालेचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे तिला या मालिकेमधून विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेट संघाची कमान या मालिकेमध्ये देण्यात आली आहे त्याचबरोबर अनेक नव्या चेहऱ्याना सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.