IND vs NZ 1st T20 Live First Innings
IND vs NZ 1st T20 Live: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना आज खेळला जात आहे. हा सामना क्राइस्टचर्चमधील हॅगले ओव्हलवर सुरु आहे. या सामन्यात, भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ विकेट्स गमावून २२५ धावा केल्या. किवींनी भारतासमोर विजयासाठी २२६ धावांचे लक्ष्य ठेवले. ग्लेन फिलिप्सने तुफानी फलंदाजी करत ४० चेंडूमध्ये ८० धावा ठोकल्या.
भारतीय संघात काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. भुवनेश्वर कुमारने तब्बल ४ वर्षानंतर भारतीय संघात दमदार पुनरागमन केले आहे. तर, वैभव सूर्यवंशीला अजूनही आपल्या संधीचा वाट पाहावी लागणार आहे.
न्यूझीलंडचा शानदार सुरुवात
न्यूझीलंडने डावाची दमदार सुरुवात केली. टीम सायफर्ट आणि फिन ॲलन यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. मयंक यादवने टीम सायफर्टला २४ धावांवर बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. यानंतर, फिन ॲलनने २४ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावांचे योगदान दिले. फिरकीपटू अक्षर पटेलने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण ३१ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. या ३१ सामन्यांपैकी भारताने १९, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. गेल्या सात वर्षांत न्यूझीलंडच्या भूमीवर भारताने एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना गमावलेला नाही.
भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मयंक यादव, अर्शदीप सिंग.
न्यूझीलंड: फिन ऍलन, टिम सेफर्ट, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेवन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, ऍडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन.






