फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
India vs New Zealand Champion Trophy 2025 Final Match : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलच्या सामन्याचा शुभारंभ झाला आहे. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने आणखी एकदा नाणेफेक गमावले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा रोहित शर्माने बारावा टॉस गमावला आहे. भारताच्या संघासमोर पहिले गोलंदाजीची आव्हान असणार आहे. भारताच्या संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये टीम इंडियाने एकही सामना न गमावता फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाकडून चाहत्यांना टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताच्या फलंदाजांनी त्याचबरोबर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी देखील मोठे योगदान दिले आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मागील सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक हुकले होते त्यामुळे त्याच्या कमालीचा सुरु असलेल्या फॉर्मकडे चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे. आज तो त्याच्या करियरचा ५५० वा सामना खेळणार आहे. आज पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
CT 2025. New Zealand won the toss and elected to bat. https://t.co/uCIvPtzZQH #INDvNZ #ChampionsTrophy #Final
— BCCI (@BCCI) March 9, 2025
तर दुसरीकडे भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिल मागील दोन सामन्यांमध्ये विशेष कामगिरी करू शकला नाही त्यामुळे त्याच्या खेळीवर चाहत्यांची नजर असणार आहे. भारताचा मिस्ट्री स्पिनर आज कशी कामगिरी करणार आणि किती विकेट्स घेणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मागील काही वर्षांमध्ये कमालीची कॅप्टन्सी स्किल्स दाखवले आहेत. टीम इंडियाचा इम्पॅट प्लेयर हार्दिक पंड्याने कमाल फक्त गोलंदाजीमध्येच नाही तर फलंदाजीमध्ये देखील दाखवली आहे. त्याचबरोबर फिरकी गोलंदाज वरूण चक्रवर्तीने संघासाठी २ सामन्यांमध्ये ७ विकेट्स संघासाठी घेतली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावली. रोहितने टॉस गमावण्याची ही सलग १५ वी वेळ आहे, परंतु टीम इंडियाने टॉस गमावल्याने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. आता भारताचा विजय निश्चित मानला जात आहे, कारण यापूर्वी भारताने दुबईच्या मैदानावर सलग चार वेळा नाणेफेक गमावली होती आणि त्या सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला होता. आजच्या सामन्यातही असेच घडले, रोहितने सामन्यात नाणेफेक गमावली, आता आपण अंतिम सामन्याच्या निकालाची वाट पाहत आहोत.