Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड, मालिकेत बरोबरी, कोणाच्या हाती लागणार सिरीज?

आज या मालिकेचा शेवटचा सामना रंगणार आहे. मागील दोन सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवून मालिकेमध्ये बरोबरी केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 29, 2024 | 08:29 AM
फोटो सौजन्य - BCCI Women

फोटो सौजन्य - BCCI Women

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय महिला संघाची सध्या न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरु आहे. भारत न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यत दोन एकदिवसीय सामने झाले आहेत. आज या मालिकेचा शेवटचा सामना रंगणार आहे. मागील दोन सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवून मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी केली आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. भारताच्या संघाने विश्वचषकात पहिल्या सामान्यत न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे भारताची कर्णधार हरमनप्रीत संघाबाहेर होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात हरमनप्रीतने भारतीय क्रिकेट संघामध्ये पुनरागमन केले. आजचा मालिकेचा शेवटचा सामना असणार आहे त्यामुळे आजच्या सामन्यात ज्या संघाचा विजय होईल तो संघ मालिका नावावर करेल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना

पहिल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती. नाणेफेक जिंकून टीम इंडियाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत २२७ धावा केल्या यामध्ये तेजल हसबनीस आणि दीप्ती शर्मा यांनी संघासाठी कमालीची कामगिरी करून दाखवली. तेजल हसबनीसने संघासाठी पहिल्या सामन्यात ४२ धावा केल्या तर दीप्ती शर्माने संघासाठी ४१ धावा केल्या. शेफाली वर्माने २२ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या. त्यानंतर यास्तिका भाटियाने संघासाठी ३७ धावांची खेळी खेळली. जेमिमाह रॉड्रिक्सने संघासाठी महत्वाची ३५ धावांची खेळी खेळली.

भारतीय महिला गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अविश्वनीय कामगिरी करून दाखवली. यामध्ये फिरकी गोलंदाज राधा यादवने संघासाठी ३ विकेट्स नावावर केले. साईमा ठोकरने संघासाठी दोन विकेट्स नावावर केले. तर दीप्ती शर्मा आणि अरुंधरी रेड्डी या दोघीनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला. गोलंदाजांच्या कमालीच्या कामगिरीमुळे न्यूझीलंडचा संघ १६८ धावांवर बाद झाला आणि भारताच्या संघाला मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळाला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात २६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ५ धावांवर संघाने पहिला विकेट गमावला. स्मृती मानधना खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतली. जेस कारने शेफाली वर्माला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ली ताहुहूने आपल्या तिसऱ्या षटकात यास्तिकाला बाद केले. जेमिमाह रॉड्रिग्जला २८ चेंडूत केवळ १७ धावा करता आल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३५ चेंडूत २४ धावा केल्या. तेजल आणि दीप्तीने १५-१५धावा केल्या. अरुंधती रेड्डी दोन धावा करून बाद झाल्या तर सायमा २९ धावा करून बाद झाल्या. राधा यादव ६४ चेंडूत ४८ धावा करून बाद झाली आणि संघाने सामना गमावला.

भारतीय महिला संघाची प्लेइंग इलेव्हन :

शेफाली वर्मा, स्मृती मानधना, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, सायमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा.

Web Title: India vs new zealand series tied who will win the series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 08:29 AM

Topics:  

  • cricket
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

IND W vs PAK W: गल्ली क्रिकेटपेक्षाही वाईट अवस्था! भारत-पाकिस्तान सामन्यात मच्छरांचा ‘आतंक’, १५ मिनिटे थांबवावा लागला सामना
1

IND W vs PAK W: गल्ली क्रिकेटपेक्षाही वाईट अवस्था! भारत-पाकिस्तान सामन्यात मच्छरांचा ‘आतंक’, १५ मिनिटे थांबवावा लागला सामना

IND W vs PAK W Toss Update : भारतीय महिला संघ पाकला धूळ चारण्यासाठी सज्ज! फातिमा सनाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
2

IND W vs PAK W Toss Update : भारतीय महिला संघ पाकला धूळ चारण्यासाठी सज्ज! फातिमा सनाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

Bigg Boss 19 च्या घरात दिपक चाहर करणार एन्ट्री? सलमान खानसोबत खेळला सामना, वाचा सविस्तर
3

Bigg Boss 19 च्या घरात दिपक चाहर करणार एन्ट्री? सलमान खानसोबत खेळला सामना, वाचा सविस्तर

पाकिस्तान माझे जन्मस्थान आहे, पण भारत माझी मातृभूमी आहे… दानिश कनेरियाने का दिले स्पष्टीकरण?
4

पाकिस्तान माझे जन्मस्थान आहे, पण भारत माझी मातृभूमी आहे… दानिश कनेरियाने का दिले स्पष्टीकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.