
IND Vs NZ
भारत न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा सामना उद्या खेळवला होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. टीम इंडिया या आघाडीवर असली तरी देखील उद्याचा सामना निर्णायक असणार आहे. या महत्त्वाच्या लढतीपूर्वी भारतीय कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्याच्याकडे इतिहास रचण्याची ही अखेरची संधी असल्याचे म्हटले जात आहे.
Rohit Sharma: हिटमॅनच्या वादळी खेळीत West Indies बुडालं; रोहित शर्माने केला 12 हजार रन्सचा रेकॉर्ड
न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजमध्ये रोहित शर्माला अद्याप एकही मोठी खेळी करता आलेली नाहीये. त्यामुळे शेवटच्या सामन्यात रोहित शर्माच्या बॅटमधून चांगली खेळी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘हिटमॅन’ रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले असले, तरी न्यूझीलंडच्या भूमीवर त्याला अद्याप एकही वनडे शतक ठोकता आलेले नाही.
भारतीय संघाने विजय मिळवत या सिरीजमध्ये आघाडी घेतली होती. दुसरा सामना देखील बहर्तणे जिंकत सिरीजमध्ये आघाडी घेतली होती. तिसरा सामना मुसळधार पावसामुळे रद्द झाला होता. तसेच चौथा सामना न्यूझीलंडने जिंकला आहे. त्यामुळे उद्या होणारा शेवटचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे.
या संपूर्ण सिरीजमध्ये रोहित शर्माची बॅट शांत असल्याचे दिसून आले. या सिरीमध्ये त्याला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. उलट दोन वेळेस तो शून्यावर आउट झाला. पहिल्या सामन्यात शून्यावर आउट झाला. तर रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यात केवळ 23 रन्सच करू शकला. तर चौथ्या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर आउट झाला. त्यामुळे त्याचा फॉर्म नसल्याचे समजते आहे.
रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
Ans: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चार सामन्यांमध्ये रोहित शर्मा दोन वेळा शून्यावर आउट झाला.
Ans: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा वनडे सामना उद्या खेळवला जाणार आहे.