Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli: विराट कोहली इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर! ‘इतक्या’ धावा करताच मोडणार मास्टर ब्लास्टरचा मोठा रेकॉर्ड

IND vs NZ Virat Kohli need 58 runs Breaking Sachin Tendulkar Record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा एकदिवसीय सामना माउंट माउंगानुई येथे खेळला जाईल. या सामन्यात विराट कोहलीवर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 14, 2026 | 06:03 PM
virat kohli

virat kohli

Follow Us
Follow Us:
  • विराट कोहलीची सचिनला धोबीपछाड देण्याची तयारी
  • पाचव्या वनडेत विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी
  • ५८ धावांत कोहली रचणार इतिहास
Virat Kohli: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिका निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेत आतापर्यंत चार सामने खेळले गेले आहेत. भारताने सुरुवातीचे दोन सामने जिंकले तर न्यूझीलंडने देखील चौथ्या सामन्यात दमदार कमबॅक केले. भारत मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. त्यामुळे पाचव्या आणि अंतिम सामना हा दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. हा सामना जिंकून भारत मालिक खिशात घालेल. तर, न्यूझीलंड शेवटचा सामना जिंकून मालिका ड्रॉ करण्याचा प्रयत्न करेल. परंतु, या सामन्यात सर्वांचे लक्ष विराट कोहलीवर असणार आहे. काही धावा करताच कोहली सचिन तेंडुलकरला मागे टाकून एक मोठा विक्रम प्रस्थापित करू शकतो.

IND vs NZ: टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची लढाई! पण निर्णायक सामन्यात पाऊस ‘खेळ’ बिघडवणार; पाहा Weather Report

कोहली मोडणार सचिनचा रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीला संघाच्या विजयासह इतिहास रचण्याचीही संधी आहे. सध्या न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने १८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६५२ धावा केल्या आहेत. या यादीत वीरेंद्र सेहवाग ५९८ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली १५ सामन्यांमध्ये ५९५ धावा करून तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीकडे सचिनला मागे टाकण्याची संधी आहे. जर त्याने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ५८ धावा केल्या, तर तो पहिल्या क्रमांकावर पोहोचेल.

शेवटचा सामना केव्हा आणि कुठे ?

चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने जोरदार पुनरागमन केले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३३३ धावा केल्या. किवी गोलंदाजांनी देखील घातक गोलंदाजी करत भारताला ८९ धावांवर गुंडाळले. न्यूझीलंडने भारताला २४४ धावांच्या मोठ्या फरकाने हरवले. आता माउंट माउंगानुई येथील बे ओव्हलवर खेळला जाईल. नेहमीप्रमाणे, सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ७:३० वाजता सुरू होईल.

२०२० पासून न्यूझीलंड बे ओव्हलवर एकही सामना हरलेला नाही. या मैदानावर संघाची कामगिरी उत्कृष्ट आहे. येथे खेळल्या गेलेल्या १२ सामन्यांपैकी किवींनी सात सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतासमोर एक कठीण आव्हान असणार आहे. पाचव्या सामन्यातही श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करणार आहे.

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक लढतीआधी भारताला धक्का! ‘या’ स्टार खेळाडूची अचानक एक्झिट; कोण घेणार जागा?

Web Title: Virat kohli 58 runs break sachin tendulkar record ind vs nz 5th odi pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Sachin Tendulkar
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs NZ: टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची लढाई! पण निर्णायक सामन्यात पाऊस ‘खेळ’ बिघडवणार; पाहा Weather Report
1

IND vs NZ: टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची लढाई! पण निर्णायक सामन्यात पाऊस ‘खेळ’ बिघडवणार; पाहा Weather Report

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक लढतीआधी भारताला धक्का! ‘या’ स्टार खेळाडूची अचानक एक्झिट; कोण घेणार जागा?
2

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक लढतीआधी भारताला धक्का! ‘या’ स्टार खेळाडूची अचानक एक्झिट; कोण घेणार जागा?

IND Vs NZ: टीव्ही समोरच बसून रहा! भारत-न्यूझीलंडमध्ये शेवटचा सामना, कुठे आणि केव्हा भिडणार?
3

IND Vs NZ: टीव्ही समोरच बसून रहा! भारत-न्यूझीलंडमध्ये शेवटचा सामना, कुठे आणि केव्हा भिडणार?

IND vs NZ Test: भारतीय संघात मोठा बदल! कुलदीप यादव OUT, ‘या’ खेळाडूची एंट्री निश्चित
4

IND vs NZ Test: भारतीय संघात मोठा बदल! कुलदीप यादव OUT, ‘या’ खेळाडूची एंट्री निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.