फोटो सौजन्य - बीसीसीआय
भारत पाकिस्तान सामना झाल्यानंतर मोठा वाद पाहायला मिळाला होता. भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघासोबत हस्तादोलन न केल्यामुळे सोशल मिडियावर मोठा गोंधळ उडाला होता. आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यानंतर ‘हातमिळवणी न करण्याच्या’ वादाला वेग आला आहे. पाकिस्तानला ७ विकेट्सने हरवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानशी हस्तांदोलन केले नाही.
संपूर्ण भारतीय संघ थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि पाकिस्तानला त्यांचे वर्तन आवडले नाही, ज्यामुळे पीसीबीने नाराजी व्यक्त केली आणि एसीसी (आशियाई क्रिकेट परिषद) आणि आयसीसीकडे तक्रार दाखल केली. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या वादावर आपले मौन सोडले आहे आणि यात काहीही चुकीचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. खरं तर, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला स्पष्ट केले की सामन्यानंतर विरोधी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे (हँडशेक कॉन्ट्रोव्हर्सी नाही) हा सदिच्छा आहे आणि तो अनिवार्य नियम नाही.
Speed World Championships 2025 मध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंने दाखवली चमक, आनंद कुमारने रचला इतिहास
ते पुढे म्हणाले, “जर तुम्ही नियमावली वाचली तर, प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूंनी विरोधी संघाशी हस्तांदोलन करावे असे कुठेही लिहिलेले नाही. हे फक्त क्रीडा भावनेने उचललेले पाऊल आहे, जगभरातील देशांमध्ये पाळला जाणारा कायदा नाही. आणि जेव्हा दोन देशांमधील संबंध तणावपूर्ण असतात, तेव्हा भारतीय संघावर हस्तांदोलन करण्यासाठी कोणताही दबाव आणता येत नाही.”
पीसीबीने केवळ तक्रारच केली नाही तर आशिया कपमध्ये काम करणारे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणीही केली. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी म्हणाले की, भारतीय खेळाडूंनी ‘क्रिकेटच्या भावनेचे’ उल्लंघन केले आहे आणि रेफरी देखील या प्रकरणात कठोर राहिलेले नाहीत. नक्वी यांनी एक्स वर लिहिले, “पीसीबीने मॅच रेफ्रीविरुद्ध आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. आचारसंहिता आणि क्रिकेटच्या भावनेचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना आशिया कपमधून तात्काळ काढून टाकण्याची मागणी आम्ही केली आहे.”
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨
The ICC is likely to reject PCB’s demand to replace match referee Andy Pycroft, as he had very little role in the handshake fiasco during the India-Pakistan game!#PCB #ICC #T20Is #AsiaCup #Sportskeeda pic.twitter.com/hUHxgEBYYz
— Sportskeeda (@Sportskeeda) September 15, 2025
भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव यांने पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितले होते की बऱ्याचदा काही गोष्टी अशाही असतात ज्या खेळापेक्षा वर ठेवाव्या लागतात. आमचा देश आणि आमचे नागरीक हे आमची जबाबदारी आहे. यावरुन सोशल मिडियावर भारतीय संघाचे कौतुक झाले त्याचबरोबर पाकिस्तान संघाला क्रिकेट चाहत्यांनी ट्रोल देखील केले.