महामुकाबला : आशिया कप २०२३ मध्ये आज १० सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तानचा महामुकाबला पाहायला मिळणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागले आहे. भारतासाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या संघाने प्लेइंग ११ संघ जाहीर केला आहे. आशिया चषक २०२३ मध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान संघ सुपर ४ मध्ये आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तानचा संघ चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरेल. आजचा हा सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे.
आजच्या सामन्यावर सुद्धा पावसाचे सावट असणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. आजचा हा हायव्होलटेज सामना ओटीटी प्लॅटफॉर्म वर सुद्धा दिसणार आहे. हा सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रसारित केला जाईल. मात्र, मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी असेल.
पाकिस्तानच्या विरोधात भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण. राखीव खेळाडू : संजू सॅमसन
भारताच्या विरोधात पाकिस्तानचा संघ
फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रौफ.