फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आज दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी काही दिवसापूर्वी साऊथ आफ्रिकेला पोहोचली आहे. आज म्हणजेच ८ नोव्हेंबरपासून या मालिकेला शुभारंभ होणार आहे. आजच्या या सामन्याचे आयोजन या मालिकेतील पहिला सामना डर्बनच्या किंग्समीड स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होणार आहे. ज्यामध्ये भारत T20 मध्ये आपली विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी खेळणार आहे. भारताने आपली शेवटची T20 मालिका बांग्लादेशविरुद्ध खेळली होती, ज्यामध्ये 3-0 ने विजय मिळवला होता. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चार सामान्यांची मालिका होणार आहे.
आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यातील हवामानाची चिंता क्रिकेट चाहत्यांना आहे. पावसामुळे सामना हा आजचा सामना खराब होऊ शकतो, असे बोलले जात आहे. परंतु आजच्या सामन्यांमध्ये डर्बनचे हवामान कसे असेल यावर एकदा नजर टाका.
हेदेखील वाचा – ICC Cricket World Cup League 2 : संयुक्त अरब अमिरातीने केला लाजिरवाणा विक्रम; तब्बल 6 फलंदाज लागोपाठ 0 शून्यावर बाद
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, डर्बनमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी काही भागात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे खेळपट्टीच्या स्थितीवर परिणाम होऊ शकतो. दिवसभर तापमान 20 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे खेळाडूंना थंडी आणि आर्द्रतेचा सामना करावा लागू शकतो. आजच्या सामन्यावर चाहत्यांच्या नजर असणार आहे.
वाऱ्याचा वेग साधारणतः 13 किलोमीटर प्रति तास असेल, परंतु काहीवेळा तो ताशी 41 किलोमीटरपर्यंत वाढू शकतो. यासह, पावसाची 40% शक्यता आहे, ज्यामध्ये गडगडाट आणि विजांच्या 24% शक्यतांचा समावेश आहे. दिवसा हलक्या रिमझिम पावसाची शक्यता फक्त 10% आहे, परंतु संध्याकाळी पावसाचा धोका वाढू शकतो. तथापि, हा हलका पाऊस असूनही, सामना सुरळीत सुरू राहण्याची अपेक्षा आहे, कारण या क्षणी गंभीर व्यत्यय येण्याची शक्यता कमी आहे.
Trophy Unveiling ✅
Captains Photoshoot ✅#SAvIND | #TeamIndia | @surya_14kumar pic.twitter.com/9luB04GoLW
— BCCI (@BCCI) November 7, 2024
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशाक, आवेश खान, यश दयाल.
एडन मार्कराम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, जेराल्ड कोएत्झी, डोनोव्हान फरेरा, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, मिहलाली मपोंगवाना, एनक्यूबाबा पीटर, अँडिले सिमेलेन, लुथो सिपामला, ट्रिस्टन स्टब्स