संयुक्त अरब अमिरातीने केला लाजिरवाणा विक्रम; तब्बल 6 फलंदाज लागोपाठ 0 शून्यावर बाद
ICC Cricket World Cup League-2 : ICC क्रिकेट विश्वचषक लीग-२ मध्ये गुरुवारी एक विक्रमी सामना खेळला गेला. अल अमिरातीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) 6 फलंदाजांना आपले खातेही उघडता आले नाही. यासह यूएईने एका डावात सर्वाधिक फलंदाज 0 धावांवर बाद होण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. ओमानने यूएईला हा विक्रम करण्यास भाग पाडले. ओमानने हा सामना 4 गडी राखून जिंकला. या लाजीरवाण्या परफाॅर्मन्समुळे संयुक्त अरब अमिरातीच्या नावावर एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करण्यात आला आहे.
ओमानचा यूएईवर शानदार विजय
Oman gain two crucial points after a comfortable win over UAE in the ICC Men’s @cricketworldcup League 2 game.#OMAvUAE 📝: https://t.co/aq4WYAmw1j pic.twitter.com/FNy5YgnfZs
— ICC (@ICC) November 1, 2024
पाकिस्तानला तीनदा पेच सहन करावा लागला
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही सहावी वेळ आहे, जेव्हा एका संघाचे 6 फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. पाकिस्तानला सर्वाधिक तीन वेळा या पेचाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांनी प्रत्येकी एकदा या परिस्थितीचा सामना केला आहे. आता या यादीत यूएईचाही समावेश झाला आहे.
शकील अहमदने घेतले ५ बळी
ICC क्रिकेट विश्वचषक लीग-२ मध्ये गुरुवारी ओमान आणि यूएई यांच्यात सामना झाला. ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याच्या गोलंदाजांनी घेतला. शकील अहमदने ओमानच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले आणि 5 बळी घेतले. जय ओडेराने दोन गडी बाद केले. मुझाहिर रझा आणि समय श्रीवास्तव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
UAE ची फलंदाजी
ओमानने नाणेफेक जिंकून UAE ला फलंदाजीसाठी बोलावले यामध्ये संयुक्त अरब अमिरातीचे फलंदाज सुरुवातीपासूनच पूर्णपणे अपयशी ठरले. ओमानच्या गोलंदाजांनी अक्षरशः UAE चा धुव्वा उडवला. सलामीला आलेल्या आयांश शर्मा मुझ्झफिर रझाच्या चेंडूवर पायचित झाला. त्यानंतर मोहम्मद वसीम शकील अहमदच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने अवघ्या 13 धावा केल्या. विकेटकिपर अरविंद हा 11 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर विष्णू सुकुमारन, राहुल चोप्रा, आयान खान हे खाते न उघडता 0 शून्यावरच बाद झाले. त्यानंतर अली नासीरने 20 चा आकडा पार करीत 21 धावा केल्या. UAE चा संपूर्ण संघ अवघ्या 25.3 चेंडूत 78 धावांवर गारद झाला.
UAE चा संघ 78 धावांवर ऑलआऊट
ओमानच्या या गोलंदाजीसमोर यूएईचा संघ 25.3 षटकांत 78 धावा करून सर्वबाद झाला. अली नसीरने 21 धावा करून संघाचा सर्वाधिक धावा केला. जुनैद सिद्दीक, मोहम्मद वसीमने 13-13 धावा केल्या. बासिल हमीदने 12 धावांची तर व्ही अरविंदने 11 धावांची खेळी खेळली. उर्वरित 6 फलंदाज शून्यावर परतले. शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांमध्ये आर्यन शर्मा, विष्णू सुकुमारन, कर्णधार राहुल चोप्रा, अयान अफजल खान, ध्रुव पराशर आणि राहुल भाटिया यांचा समावेश होता. विशेष म्हणजे खाते उघडणाऱ्या सर्व 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. ओमानकडून 5 सर्वाधिक बळी शकील अहमदने घेतले. त्यानंतर जय ओडेराने 2 बळी घेतल्या. त्यानंतर मुझाहीर रझा, आणि समय श्रीवास्तवने प्रत्येकी 1 बळी घेतला.