
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा जाहीर! वर्ल्ड कपपूर्वी रंगणार ५ सामन्यांचा थरार (Photo Credit- X)
ही मालिका दक्षिण आफ्रिकेतील तीन प्रमुख शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. मालिकेची सुरुवात डर्बनमधील ऐतिहासिक किंग्जमीड स्टेडियमवर होईल. त्यानंतर जोहान्सबर्गमधील वॉन्डरर्स स्टेडियमवर दोन सामने खेळवले जातील आणि मालिकेचा शेवट बेनोनी येथे होईल.
FIXTURE ANNOUNCEMENT 🚨 Cricket South Africa (CSA) is pleased to announce an inbound T20 International (T20I) series between World Cup finalists, the Proteas Women and India, scheduled to take place in Durban, Johannesburg and Benoni from 17 – 27 April 2026. The five-match T20I… pic.twitter.com/SQC0au4qkU — Proteas Women (@ProteasWomenCSA) January 20, 2026
पहिला टी-२०: १७ एप्रिल २०२६ – किंग्जमीड, डर्बन
दुसरा टी-२०: १९ एप्रिल २०२६ – किंग्जमीड, डर्बन
तिसरा टी-२०: २२ एप्रिल २०२६ – वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग
चौथा टी-२०: २५ एप्रिल २०२६ – वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग
पाचवा टी-२०: २७ एप्रिल २०२६ – विलोमूर पार्क, बेनोनी
इंग्लंडमध्ये १२ जून २०२६ पासून महिला टी-२० विश्वचषक सुरू होत आहे. या मेगा इव्हेंटपूर्वी आपली ताकद आजमावण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकाच्या ‘गट १’ मध्ये स्थान मिळाले आहे, ज्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांसारख्या बलाढ्य संघांचा समावेश आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे संचालक या मालिकेबाबत म्हणाले की, “विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी आमच्या संघाला भारतासारख्या जागतिक दर्जाच्या संघाविरुद्ध खेळण्याची गरज आहे. यामुळे आमच्या खेळाडूंना सर्वोच्च पातळीवर स्वतःची चाचणी घेता येईल.”
भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. त्या ऐतिहासिक फायनलमध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते. आता आपल्या घरच्या मैदानावर भारतीय संघाला रोखण्याचे मोठे आव्हान यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर असेल.
MI VS DC : हरमन आणि जेमिमाह विजयाच्या शोधात! कोणच्या हाती लागणार सामना? वाचा Match Preview