खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत भारत ठरला विश्वविजेता, बीडच्या प्रियंकाने रचला इतिहास
भारताने पहिल्या खो-खो विश्वचषकावर नाव कोरत इतिहास घडवला आहे. दिल्लीमध्ये आज (१९ जानेवारी) पहिल्या खो-खो विश्वचषकातील महिला गटाचा अंतिम सामना पार पडला. अंतिम सामन्यात भारत आणि नेपाळ समोरसमोर होते. या सामन्यामध्ये बीडच्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला खो-खो संघाने नेपाळवर ३८ गुणांच्या फरकाने विजय मिळवला.
Suryakumar Yadav: ‘मिस्टर 360’ संघात असता तर…; ‘सूर्या’ नसल्याने ‘हा’ खेळाडू BCCI वर संतापला
भारतीय महिला खो-खो संघ पहिल्या सामन्यापासूनच वरचढ ठरत होता. पहिल्या सामन्यात महिला संघाने तब्बल १७६ गुणांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. अंतिम सामन्यात मात्र भारतासमोर नेपाळचं आव्हान होतं. हे आव्हान स्वीकात महिला संघाने पहिला खो-खो विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे.
अंतिम सामन्यात पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय महिला संघ आघाडीवर होता. तेव्हा ३४-० च्या अंतराने नेपाळचा संघ पिछाडीवर होता. पुढे नेपाळच्या महिला खेळाडूंनी दबाव टाकत गुणसंख्या ३५-२४ वर नेली. दुसऱ्या टप्प्यावर काहीसा वरचढ ठरलेला नेपाळचा संघ तिसऱ्या टप्प्यात मागे पडला. तर भारताच्या लेकींनी पुन्हा आघाडी घेत आणखी ३८ गुण मिळवले.
IND vs WI : T20 विश्वचषकात भारताने वेस्ट इंडिजला केलं पराभूत, 8 खेळाडू सिंगल डिजिटमध्ये बाद
चौथ्या टप्प्यात नेपाळने आक्रमणाला सुरुवात केली. पण भारतासमोर त्यांचा टिकाव लागला नाही. भारतीय संघाने ७८-४० अशा गुणांच्या फरकाने नेपाळच्या महिला संघावर मात केली आणि पहिल्या खो-खो विश्वचषक जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे. महिला गटाचा अंतिम सामना संपल्यानंतर पुरुषांचा अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे.
भारतीय संघासाठी हा सामना कठीण मानला जात होता कारण त्यांच्याप्रमाणेच नेपाळ देखील एक मजबूत खो-खो संघ आहे, परंतु भारतीय महिलांनी पहिल्या फेरीपासूनच आपले वर्चस्व कायम ठेवले. भारतीय संघाने पहिल्या फेरीत आक्रमण केले आणि बचावात नेपाळी खेळाडूंनी केलेल्या चुकांचा पुरेपूर फायदा घेतला आणि सामन्याची सुरुवात ३४-० च्या मोठ्या आघाडीने केली. दुसऱ्या वळणावर, नेपाळने आक्रमण केले आणि संघाने आपले खाते उघडले पण भारतीय बचावपटूंनी त्यांना सहजासहजी गुण मिळवू दिले नाहीत. अशाप्रकारे, दुसऱ्या टर्ननंतर, स्कोअर ३५-२४ होता.
तिसऱ्या वळणावर, भारताची पुन्हा आक्रमण करण्याची पाळी होती आणि यावेळी टीम इंडियाने आपली आघाडी निर्णायक स्थितीत नेली. यावेळी सुरुवात थोडी संथ असली तरी हाफ टाईमनंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमणाचा वेग वाढवला आणि धावसंख्या थेट ७३-२४ पर्यंत पोहोचली. येथून नेपाळचे परतणे जवळजवळ अशक्य झाले आणि शेवटी हेच घडले. नेपाळच्या आक्रमकांना टर्न-४ मध्ये जास्त गुण मिळवता आले नाहीत आणि भारताने ७८-४० च्या गुणांसह सामना जिंकला.