फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : आयसीसी महिला अंडर-१९ T२० विश्वचषक २०२५ सध्या सुरु आहे. यामध्ये भारताचा संघ A गटामध्ये आहे. या स्पर्धेमध्ये १६ संघ सहभागी झाले आहेत. आयसीसी महिला अंडर-१९ T२० विश्वचषक २०२५ मध्ये भारताने धमाका केला आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला. निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ९ विकेट राखून पराभव केला. क्वालालंपूरच्या ब्युमास ओव्हल स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. वेस्ट इंडिजला अवघ्या ४४ धावांत गुंडाळल्यानंतर निकी ब्रिगेडने सामना सहज जिंकला.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघातील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताची कर्णधार निकीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. तिचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी अगदी योग्य असल्याचे सिद्ध केले. पारुनिका सिसोदियाने अप्रतिम परफॉर्मन्स दिला. सिसोदियाने २.२ षटकात केवळ ७ धावा दिल्या आणि तीन विकेट घेतल्या. एवढेच नव्हे तर वेस्ट इंडिजला पहिला धक्का कर्णधार समारा रामनाथच्या रूपाने दिला. कर्णधार समारा रामनाथने संघासाठी ३१ धावा केल्या होत्या. यानंतरही वेस्ट इंडिजच्या विकेट पडण्याची प्रक्रिया थांबली नाही. वेस्ट इंडिजचा निम्मा संघ केवळ २६ धावा जोडून पॅव्हेलियनमध्ये परतला.
Innings Break!
A terrific bowling performance 🙌
Over to our batters 💪
Updates ▶️ https://t.co/EHIxnF1mFp#TeamIndia | #INDvWI | #U19WorldCup pic.twitter.com/rBT8CyGGJe
— BCCI Women (@BCCIWomen) January 19, 2025
वेस्ट इंडिजचे ८ खेळाडू सिंगल डिजिटमध्ये बाद झाले, त्यापैकी पाच खेळाडूंना धावाही करता आल्या नाहीत. वेस्ट इंडिजकडून केनिका कासारने (१५) सर्वाधिक धावा केल्या. सलामीवीर असाबी कॉलेंडरने १२ धावांचे योगदान दिले. पारुनिकाशिवाय आयुषी शुक्ला आणि जोशिता व्हीजे यांनी चांगली गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. आयुषीने ६ तर जोशिताने ५ धावा दिल्या. वेस्ट इंडिजचे तीन खेळाडू धावबाद झाले.
त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर गोंगडी त्रिशाने तिची विकेट गमावली. त्याला जहझारा क्लॅक्सटनने झेलबाद केले. त्रिशाने दोन चेंडूत चार धावा केल्या. यानंतर यष्टिरक्षक जी कमलिनी आणि सानिका चाळके यांनी भारताच्या विजयाची धुरा सांभाळली. भारताने ४.२ षटकात ४७ धावा करत विजय मिळवला. कमलिनीने विजयी चौकार मारले. त्याने १३ चेंडूंत तीन चौकारांसह नाबाद १६ धावा केल्या. सानिकाने ११ चेंडूत नाबाद १८ धावा केल्या. त्याने तीन चौकारही मारले.