फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारतामध्ये T२० मालिका खेळत आहे. यामध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताच्या संघाचा दक्षिण आफ्रिकेने १२ धावांनी पराभव केला. या सामान्यचे आयोजन चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाईक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी दक्षिण आफ्रिकेने ४ गडी राखून १८९ धावांचे लक्ष्य भारतासाठी ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाला २० षटकांत ४ गडी गमावून केवळ १७७ धावा करता आल्या.
या मालिकेतील दुसरा सामना ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. तीन सामान्यांची मालिका आहे त्यामुळे भारताच्या संघाला दुसरा सामना जिकण अनिवार्य आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिले फलंदाजी करताना त्यांचे सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. राधा यादवने ही भागीदारी तोडली. त्याने लॉरा वोल्वार्डला बोल्ड केले. लॉरा वोल्वार्डने २२ चेंडूत ३३ धावा केल्या. त्यानंतर त्यांची सर्वात मोठी भागीदारी ही दुसऱ्या विकेट्ससाठी करण्यात आली होती. ब्रिट्स आणि मारिजन कॅप यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. राधा यादवने १७ व्या षटकात कॅपला आपला बळी बनवले. कॅपने ३३ चेंडूत ५७ धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सामना जिंकून दिला.
भारतीय संघाच्या फलंदाजीचा विचार केला तर १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात अयाबोंगा खाकाने शेफालीला आपली शिकार बनवले. शेफालीने १४ चेंडूत १८ धावा केल्या. मंधाना 10व्या षटकात झेलबाद झाली. तिचे अर्धशतक हुकले. मंधानाने ३० चेंडूत ४६ धावांची खेळी खेळली. यामध्ये भारताची युवा खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्जने अर्धशतक झळकावले. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने जेमिमाह रॉड्रिग्जसह चौथ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. मात्र, कर्णधार आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही आणि शेवटच्या चेंडूवर बाद झाला. हरमनने ३९ चेंडूत ३५ धावा केल्या. तसेच, जेमिमाह रॉड्रिग्सने ३० चेंडूत ५३ धावा केल्यानंतर नाबाद राहिली.