फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये ४ ऑक्टोबर रोजी पहिला T20 महिला विश्वचषक २०२४ चा सामना रंगणार आहे. यामध्ये भारताचा संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. भारतीय संघाची कमान हरमनप्रीत कौरकडे असणार आहे. भारताचा संघ T20 विश्वचषक २०२४ चा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंडचा संघ हा मजबूत संघ मानला जातो. T20 महिला विश्वचषक २०२४ चे आयोजन UAE ला करण्यात आले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. न्यूझीलंडचा संघ हा क्रिकेट विश्वात एक मजबूत संघ आहे. सामन्याआधी कोणत्या संघाचं पारडं जड आहे यावर एकदा नजर टाका.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यत आयसीसी विश्वचषकामध्ये ४ वेळा सामना झाला आहे. यामध्ये भारताच्या संघाने दोन सामने जिंकले आहेत. हे सामने २०१८ आणि २०२० मध्ये जिंकले आहेत, तर न्यूझीलंडच्या संघाने भारताच्या संघाला दोन वेळा पराभूत केलं आहे. T२० फॉरमॅटबद्दल बोलायचं झालं तर भारत न्यूझीलंड हे दोन्ही संघ आतापर्यत १३ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाचे पारडे जड आहे. T२० फॉरमॅटमध्ये न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये १३ वेळा सामना झाला आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने ९ वेळा भारताला पराभूत केलं आहे तर चार वेळा भारताचा संघ विजयी झाला आहे.