मुंबई : भारताचा विस्फोटक क्रिकेपटू रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) घेत असल्याची घोषणा केली आहे. रॉबिन उथप्पाने बुधवारी १४ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. रॉबिन उथप्पाने एकदिवसीय आणि टी २० मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केल होत. निवृत्तीच्या घोषणेनंतर आजी-माजी क्रिकेटपटूसह चाहत्यांनी उथप्पासाठी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विस्फोटक फलंदाज रॉबिन उथप्पा याने २००६ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याआधी २००४ मध्ये तो अंडर १९ विश्वकप संघाचा सदस्य होता. रॉबिन उथप्पा याने भारतासाठी ४६ वनडे सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेय. त्याशिवाय १३ टी २० सामन्यात तो भारतीय संघाचा सदस्य राहिला आहे. २००७ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. त्याशिवाय दोन वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या कोलकाता संघाचा सदस्य देखील राहिला आहे. तसेच २०२१ मध्ये धोनीच्या नेतृत्वात आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नईच्या संघाचाही भाग राहिला आहे.
निवृत्तीची घोषणा करताना काय म्हणाला रॉबिन उथप्पा? :
रॉबिन उथप्पानं सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित निवृत्तीची घोषणा केली. आपल्या पोस्टमध्ये त्यानं देश आणि राज्याचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचं म्हटल आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये रॉबिन उथप्पा म्हणतो, देशाचं आणि राज्याचं प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी मोठा सन्मान होय. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट व्हायला हवाच. मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीदरम्यान, मला पाठिंबा देणारे, बीसीसीआयचे अध्यक्ष, कर्मचारी, संघातील सहकारी, माझे प्रशिक्षक, आयपीएल संघ तसेच कर्नाटक क्रिकेट या सर्वांचे मी आभार मानतो.
It has been my greatest honour to represent my country and my state, Karnataka. However, all good things must come to an end, and with a grateful heart, I have decided to retire from all forms of Indian cricket.
Thank you all ❤️ pic.twitter.com/GvWrIx2NRs
— Robin Aiyuda Uthappa (@robbieuthappa) September 14, 2022