मुंबई : कालच आशिया चषक स्पर्धा (Asia cup) संपन्न झाली. या स्पर्धेत भारतीय संघाची सुमार कामगिरी झाली. यानंतर भारत संघ ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका संघाबरोबर प्रत्येकी तीन टी-२० (T-20) सामने खेळणार आहे, त्यानंतर थेट ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी (T20 cricket World Cup) भारतीय संघ खेळणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची (india team) आज घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर करताना काही धक्के दिले आहेत. कारण गेल्या काही स्पर्धा आणि ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या पाहून भारतीय संघाची यावेळी निवड करण्यात आली आहे.
[read_also content=”पारनेरच्या पश्चिम भागाला अतिवृष्टीचा तडाखा https://www.navarashtra.com/maharashtra/heavy-rains-hit-western-part-of-parner-nrdm-325121.html”]
दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव यांचे संघातील स्थान पक्के आहे. त्याचबरोबर रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांनाही संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत फिरकी गोलंदाजांवर जास्त भर दिला होता. त्यामुळं विश्वचषक स्पर्धेत सुद्धा युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई आणि आर. अश्विन, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग यांना संधी देण्यात आली आहे.