
कधीपासून सुरू होणार आयपीएलचा थरार? (Photo Credit- X)
बीसीसीआयने यापूर्वी लिलावावेळी सर्व १० फ्रँचायझींना २६ मार्चपासून स्पर्धा सुरू होईल असे कळवले होते. मात्र, आता यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या तीन राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका. कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि चेन्नई (तामिळनाडू) ही अनुक्रमे ‘केकेआर’ आणि ‘सीएसके’ या लोकप्रिय संघांची घरची मैदाने आहेत. तसेच गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्सचे दुसरे होम ग्राऊंड आहे. या राज्यांतील निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर न झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पूर्ण वेळापत्रक निश्चित करण्यात अडचणी येत आहेत.
🚨 Cricbuzz understands IPL 2026 start may be delayed by 2 days An official announcement is expected soon pic.twitter.com/wMVnKpSdK9 — Cricbuzz (@cricbuzz) February 27, 2026
मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ
आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे वेळापत्रकात बदल करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकांचा विचार करता, बीसीसीआय यंदाही दोन टप्प्यांत वेळापत्रक जाहीर करण्याचा विचार करत आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत बोर्ड दोन पर्यायांवर चर्चा करेल. पहिल्या काही सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करणे. तर, दुसरे निवडणूक आयोगाच्या तारखांची वाट पाहून संपूर्ण वेळापत्रक एकदाच प्रसिद्ध करणे.
नियमानुसार, आयपीएलचा पहिला सामना गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवला जातो. आयपीएल २०२५ चे जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने पटकावले होते. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियमवर गेल्या वर्षी झालेल्या सेलिब्रेशन दरम्यान चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर मैदानातील सर्व उपक्रम थांबवण्यात आले आहेत. आरसीबी प्रशासन सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनशी चर्चा करत आहे. जर चिन्नास्वामी स्टेडियम उपलब्ध नसेल, तर आरसीबी आपले घरचे सामने नवी मुंबई, रायपूर किंवा पुणे येथे हलवण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्पर्धेचा सलामीचा सामना नेमका कुठे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.