Women's Hockey Asia Cup: Indian team opens with victory; thrashes Thailand 11-0
Women’s Hockey Asia Cup 2025 : महिला हॉकी आशिया कपची सुरवात झाली असून भारतीय संघाने विजयाने सुरुवात केली आहे. भारतीय महिला संघाने पहिल्या सामन्यात थायलंडला ११-० ने पराभूत करत विजयी सलामी नोंदवली आहे. थायलंडनंतर, भारत आता शनिवारी जपानशी दोन हात करणार आहे. त्यानंतर, ८ सप्टेंबर रोजी पूल स्टेजच्या शेवटच्या सामन्यात भारत सिंगापूरशी भिडणार आहे.
भारतीय महिला संघाने या आशिया कपमध्ये शानदार सुरवात केली आहे. मुमताज खानने २, उदिता दुहानने २ आणि ब्युटी डंग डंगने २ गोल करण्यात यश मिळवले आहे. या तिघांमुळे, भारतीय संघाला थायलंडविरुद्ध तब्बल ११ गोल करण्यात यशस्वी झाला आहे. त्याच वेळी, थायलंड संघ भारताविरुद्ध गोल करण्यास मात्र पूर्ण निष्प्रभ ठरल्याचे दिसून आला.
हेही वाचा : Asia cup 2025 : पाकिस्तान संघात आनंदांची लहर; लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या ‘त्या’ खेळाडूला दिलासा
मुमताज खानने ७व्या मिनिटाला आणि ४९व्या मिनिटाला असे दोन गोल केले. तर उदिताने ३० व्या आणि ५२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करण्यात यश मिळवले तर डुंग डुंगने ४५ व्या आणि ५४ व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. संगीता कुमारीने १० व्या मिनिटाला, तसेच नवनीत कौर १६ व्या मिनिटाला, लालरेमसियामी १८ व्या मिनिटाला, शर्मिला देवी ५७ व्या मिनिटाला आणि रुतुजा दादासो पिसाळ ६० व्या मिनिटाला गोल करत भारतीय गोलांची संख्या ११ वर नेली.
मुमताज खान (७’) आणि संगीता कुमारी (१०’) यांनी दोन फील्ड गोल करून भारताला आघाडी मिळवून देत पहिल्या क्वार्टरमध्ये दबदबा राखला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आणखी तीन गोल करून त्यांची आघाडी आधीक मजबूत करण्यात यश मिळवले. अनुभवी फॉरवर्ड नवनीत कौर (१६ व्या मिनिटाला) आणि मिडफिल्डर लालरेमसियामी (१८ व्या मिनिटाला) यांनी सलग दोन फील्ड गोल करून भारताला मजबूत स्थितीत पोहचवले. तर उदिता (३० व्या मिनिटाला) ने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करून पहिला हाफ उच्चांकी पातळीवर नेऊन संपवला. सामन्याच्या शेवटच्या क्वार्टरमध्ये, भारताने सलग पाच गोल नोंदवत सलामीच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला.
महिला हॉकी आशिया कप स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत. या संघाना दोन गटात विभागण्यात आले आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर ४ टप्प्यासाठी पात्र ठरणार आहेत. सुपर ४ मधील अव्वल दोन संघ १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत खेळतील. आशिया कप विजेता संघ हा पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये पार पडणाऱ्या महिला विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहे.