Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Making Of A Cricketer: नशिबाशी दोन हात करत Radha नं लिहिलं यशाचं शिखर; वाचून अंगावर येईल काटा

राधा यादवचा जन्म उत्तर प्रदेशच्या 21 एप्रिल 2000 रोजी जौनपूर येथे झाला. मात्र कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तिचे कुटुंब मुंबईत आले आणि तिथेच स्थायिक झाले. राधाचे वडील डेअरी संबंधित व्यवसायाशी जोडले गेले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 25, 2026 | 02:23 PM
The Making Of A Cricketer: नशिबाशी दोन हात करत Radha नं लिहिलं यशाचं शिखर; वाचून अंगावर येईल काटा

The Making Of A Cricketer: नशिबाशी दोन हात करत Radha नं लिहिलं यशाचं शिखर; वाचून अंगावर येईल काटा

Follow Us
Follow Us:
  • राधा यादवची भारतीय महिला संघात निवड
  • राधाच्या वडिलांचा होता दूध संबंधित व्यवसाय
  • अत्यंत प्रेरणादायी असा राहिला आहे राधाचा क्रिकेटचा प्रवास 
Radha Yadav/ तेजस भागवत: ‘द मेकिंग ऑफ अ क्रिकेटर’ या सिरिजमध्ये आज आपण भारतीय महिला क्रिकेट संघातील राधा यादव या खेळाडूबद्दल जाणून घेणार आहोत. राधा यादवच्या नशिबी लहानपणापासूनच संघर्ष पाहायला मिळाले. केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर राधा यादव आज टीम इंडियामधून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळत आहे. वडिलांचा त्याग आणि राधा यादवच्या संघर्षाची कहाणी पाहुयात.

राधा यादवचा जन्म उत्तर प्रदेशच्या 21 एप्रिल 2000 रोजी जौनपूर येथे झाला. मात्र कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तिचे कुटुंब मुंबईत आले आणि तिथेच स्थायिक झाले. राधाचे वडील डेअरी संबंधित व्यवसायाशी जोडले गेले होते. तसेच जवळच एक किराणाचे दुकान देखील ते चालत असत. राधाला वयाच्या 6 व्या वर्षापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली होती. तिथूनच तिचा इंटरनॅशनल क्रिकेटचा प्रवास सुरू झाला होता.

राधा यादवचे बालपण अत्यंत कष्टाचे आणि आर्थिक चणचणीचे गेले. तिच्याकडे क्रिकेट खेळण्याचे स्वतःचे साहित्य देखील नव्हते. ती राहत असलेल्या सोसायटीमध्ये मुलांच्यासोबत आणि आपल्या भावांसोबत क्रिकेट खेळायची. त्यावलेस एक मुलीने मुलांसोबत खेळणे अनेकांना आवडत नसे तिला आणि तिच्या कुटुंबाला लोकांचे टोमणे देखील यासाठी ऐकावे लागले होते. मात्र राधाच्या कुटुंबाने, तिच्या वडिलांनी तिला कायम क्रिकेट खेळण्यासाठी पाठिंबा दिला.

The Making Of A Cricketer: दुर्गम भागातून थेट वर्ल्ड कपच्या मैदानावर; प्रेमा रावतची मन हेलावून टाकणारी कहाणी

राधा क्रिकेट खेळत असताना तेथील क्रिकेट प्रशिक्षक प्रफुल्ल नाईक यांचे गोलंदाजीकडे लक्ष गेले. इथूनच तिचा भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचा प्रवास सुरू झाला. प्रफुल्ल नाईक यांनी राधाच्या वडिलांना तिला क्रिकेट अकादमीत पाठविण्यासाठी विचारले. आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य नसल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. मात्र त्यानंतर राधाचे टॅलेंट पाहून नाईक यांनी तिचा अकादमीचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली.

राधा यादव ही फिरकीपटू आहे. राधा यादवच्या मेहनतीला आणि जिद्दीला लवकरच यश प्राप्त झाले. तिची निवड बडोद्याच्या अंडर 19 संघात झाली. त्यानंतर तिने आपल्या स्वप्नाकडे वाटचाल सुरू केली. 13 फेब्रुवारी 2018 म्हणजेच वयाच्या 17 व्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 संघात पदार्पण केले.

The Making Of A Cricketer: आरसीबीची फॅन ते थेट टीम इंडियाची ‘स्टार’; श्रेयांकाचा डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष

2028 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये देखील तिने जबरदस्त कामगिरी केली. भारताकडून तिने सर्वाधिक असे 8 विकेट्स घेतल्या. 2020 मध्ये देखील भारतीय क्रिकेट संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली होती. 2025 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामध्ये राधा यादवचा अत्यंत मोलाचा वाटा होता.

Web Title: Indian women team player radha yadav real life struggle story to icc t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Indian Women Cricket Team
  • Radha Yadav
  • The Making of A Cricketer

संबंधित बातम्या

Women’s Asia Cup 2026: दुबईत थरार! ACC ने जाहीर केले स्पर्धेचे वेळापत्रक; भारताचा पहिला सामना कधी?
1

Women’s Asia Cup 2026: दुबईत थरार! ACC ने जाहीर केले स्पर्धेचे वेळापत्रक; भारताचा पहिला सामना कधी?

वाघिणी भिडण्यासाठी सज्ज! Women’s Asia Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; मात्र ‘ही’ खेळाडू बाहेर
2

वाघिणी भिडण्यासाठी सज्ज! Women’s Asia Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; मात्र ‘ही’ खेळाडू बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.