
भारतीय महिला संघाची फलंदाजी
आजच्या सामन्यात नेदरलँड्सचया संघाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताकडून शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. शेफाली वर्मा आणि स्मृतीने भारतासाठी दुसऱ्या विकेटसाठी ११५ रन्सची भागीदारी केली. शेफाली वर्माने शानदार अर्धशतक लगावले. शेफाली वर्मा ५५ रन्स करून आउट झाला. त्यानंतर जेमीमा रॉड्रिग्स खेळण्यासाठी आली. स्मृती मंधाना मोपठा फटका मारण्याच्या प्रयत्नांत ७४ रन्स करून आउट झाली. पाठोपाठ जेमीमा रॉड्रिग्स १७ रन्स करून आउट झाली. यास्तिका भाटीया ३ रन्स करून आउट झाली. भारताने पाठोपाठ विकेट्स गमावल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर खेळण्यासाठी आली. हरमनप्रीत कौर १२ रन्स करून आउट झाली.
IND W Vs NED W Live: भारत दुसऱ्या विजयासाठी सज्ज; नेदरलँड्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
नेदरलँड्स महिला संघाची गोलंदाजी
भारतीय संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. जवळपास ११५ रन्सपर्यंत नेदरलँड्सला एकही विकेट प्राप्त करता आले नाही. अखेर हेदर सीगर्सने नेदरलँड्सला पहिले यश मिळवून दिले. हेदर सीगर्सने शेफाली वर्माला ५५ रन्सवर आउट केले. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात मोठ्या संख्येने वाईड बॉल टाकले. मिर्थे व्हॅन डेन राडने जेमीमा रॉड्रिग्सला आउट केले. तर हेदर सीगर्सने स्मृतीची विकेट घेतली. डी लांगाने यास्तिका भाटीयाला आउट केले.
That duo at the top of the order again! 😌🤝 A fantastic 1️⃣1️⃣5️⃣-run opening partnership between Smriti Mandhana and Shafali Verma 🔝 Updates ▶️ https://t.co/FMkrKB1zcS#TeamIndia | #T20WorldCup | #WomenInBlue | #INDvNED | @mandhana_smriti | @TheShafaliVerma pic.twitter.com/F5Vs5r4drG — BCCI Women (@BCCIWomen) June 17, 2026
भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, श्री चरणी, क्रांती गौड.
नेदरलँड्स: स्टेरे कॅलिस, सान्या खुराना, फोबी मोल्केनबोअर, बाबेट डी लीडे (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रॉबिन रिजके, आयरिस झविलिंग, हीदर सीगर्स, फ्रेडरिक ओव्हरडाईक, कॅरोलिन डी लँग, सिल्व्हर सीगर्स, इसाबेल वॉन.