भारतीय महिला अन् पुरुष रिले संघ : पॅरिस ऑलम्पिक (Paris Olympics) स्पर्धेची आतुरता फक्त खेळाडूंनाच नाही तर संपूर्ण जगाला आहे. पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेमध्ये जाण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. भारतीय रिले खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय महिला आणि पुरुष रिले संघ 4×400 मीटर रिलेमध्ये पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. जागतिक ॲथलेटिक्स रिले स्पर्धा 6 जानेवारी रोजी बहामास येथे पार पडली. यामध्ये भारताच्या महिला संघाने दुसऱ्या फेरीमधील हिटमध्ये दुसरे स्थान पटकावून पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेत एंट्री केली आहे.
त्याचबरोबर पुरुष संघानेही दुसऱ्या हीटमध्ये दुसरे स्थान मिळवून पात्रता मिळवली आहे. महिला संघामध्ये रुपल चौधरी, एम आर पूवम्मा, ज्योतिका श्री दांडी आणि सुभा वेंकटेशन या चार खेळाडूंचा समावेश होता. यांनी 3.29.35 सेकंदात तर जमैकाने 3:28.54 सेकंदात हीट नंबर वनमध्ये पहिले स्थान पटकावले. भारताच्या संघाने रविवारच्या पात्रता फेरीमध्ये 3.29.74 सेकंद वेळेसह पाचवे स्थान पटकावले होते.
? INDIAN WOMEN’S TEAM QUALIFIES FOR THE #ParisOlympics in 4x400m RELAY ?
What a race! What a finish! Subha’s sprint was incredible, but it was Jyothika Dandi who gave the lead and changed the game for India.
Her second leg run was lightning-fast: 51.36s! and Subha ran the… pic.twitter.com/KDf0hPGzsO
— nnis (@nnis_sports) May 6, 2024
पुरुषांच्या संघामध्ये मोहम्मद अनस याहिया, मोहम्मद अजमल, अरोकिया राजीव आणि अमोज जेकब यांच्या पुरुष संघाने 3:3.23 सेकंदांची वेळ नोंदवत अमेरिकेच्या (2:59.95) मागे दुसरे स्थान पटकावले. दुसऱ्या फेरीतील तीन हीटमधील अव्वल दोन संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील अशी माहिती आहे. पॅरिस ऑलिम्पिक यावर्षी 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
?Watch Indian Men’s 4x400m team Qualifies for #ParisOlympics IN STYLE ?
➖Indian Men’s 4x400m team secures their spot in the #ParisOlympics with a Season-best time of 3:03.23!!!?
➖Perfect morning for #Indianathletics fans after yesterday’s setback! ?
➖Special mentions… pic.twitter.com/6tcny7Vqen
— nnis (@nnis_sports) May 6, 2024