Ind w vs Aus w: Indian women's team announced for series against Australia! Harmanpreet Kaur to lead the team
Ind w vs Aus w : बीसीसीआय निवड समितीकडून आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघ जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादवकडे संघाची धुरा सोपवली आहे. तर शुबमन गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर थोड्याच वेळात बीसीसीआय निवड समितीकडून ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया या एकदिवसीय मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतीय संघात कुणाला स्थान मिळाले आणि कुणाला नाही याबबत आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : ICC Women’s Cricket World Cup 2025 साठी भारतीय संघाची घोषणा! हरमनप्रीतकडे कर्णधारपद; जाणून घ्या संपूर्ण संघ
भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिकेत दोन हात करणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय महिला निवड समिती प्रमुख नितू डेव्हिड यांनी भारतीय संघाची घोषणा केली आहे. नितू डेव्हिड आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या दोघींनी पत्रकार परिषदेमध्ये संघ जाहीर केल्याची माहिती दिली. हरमनप्रीत कौर एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भारतीय महिला संघाने अलिकडेच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. भारताने या दौऱ्यातील टी 20 आणि एकदिवसीय मालिकेत धुमाकूळ घातला आहे. भारताने टी 20 मालिका 3-2 अशी जिंकली आहे. तर त्यानंतर एकदिवसीय मालिकेत देखील 2-1 ने विजय मिळवला होता. त्यामुळे आता भारतीय संघ आपल्या मायदेशात ऑस्ट्रेलियाला धूळ चारणार चारून सलग दुसरी एकदिवसीय मालिका जिंकणार का? हे बघण रंजक असणार आहे.
भारतीय महिला संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, रिचा घोष (विकेटकीपर), क्रांती गौड, सायली सातघरे, राधा यादव, श्री चरणी, यास्तिका भाटिया (विकेटकीपर) आणि स्नेह राणा.