शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया कपसाठी निवडलेल्या भारतीय संघ बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. निवडकर्त्यांनी खरोखरच अनेक अनपेक्षित निर्णय घेतले. श्रेयस अय्यर आशिया कपमध्ये स्थान देण्यात येईल असे वाटत असताना त्याला वगळण्यात आले. तसेच शुभमन गिलचे पुनरागामन होऊन त्याला संघाच्या उपकर्णधारपद देण्यात आले. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर, शुभमन गिलने एका वर्षापेक्षा जास्त काळ कोणताही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नव्हता. तरी त्याला स्थान देण्यात आले आहे. याबाबत बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वतः सांगितले की कॅप्टन गिलला कसे आणि का परत आणण्यात आले आहे.’
आशिया कप २०२५ साठी संघात शुभमन गिलच्या समावेशाबद्दल बोलताना, कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, तो शेवटचा टीम इंडियासाठी टी२० खेळला जो टी२० विश्वचषक नंतर, जेव्हा आम्ही श्रीलंकेला गेलो होतो. त्यावेळी मी कर्णधार होतो आणि गिल उपकर्णधार होता.
सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, येथून आम्ही टी-२० विश्वचषकासाठी एक नवीन टप्प्याची सुरवात केली आहे. तो सर्व कसोटी मालिकांमध्ये व्यस्त झाला आणि कसोटी क्रिकेट खेळण्यात व्यस्त असल्याने त्याला टी-२० खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तो म्हणाला की म्हणूनच त्याला संघात स्थान देण्यात आले आहे आणि आम्ही त्याच्यासोबत आनंदित आहोत.
शुबमन गिलने आतापर्यंत भारतासाठी एकूण २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने एकूण ५७८ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३०.४२ इतकी राहिली आही. त्याने आतापर्यंत टी-२० मध्ये १ शतक आणि ३ अर्धशतके ठोकली आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १३९.२८ असून त्याची सर्वोत्तम खेळी १२६ धावा राहिली आहे. जी त्याने न्यूझीलंडविरुद्ध खेळली आहे. तसेच ही खेळी भारताकडून टी-२० मधील सर्वात मोठी वैयक्तिक खेळी ठरली आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर..
आशिया कपसाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे
सूर्य कुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, संजू सॅम्सन, हरिखेत सिंह, रवींद्र सिंह (विकेटकीपर).
राखीव खेळाडू: यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसीध कृष्णा