Smruti Mandhana And Harmanpreet Kaur (Photo Credit- X)
Team India squad for the ICC Women’s Cricket World Cup 2025: महिला विश्वचषक २०२५ (ICC Women’s Cricket World Cup 2025) भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) संयुक्तपणे आयोजित करत आहेत. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी आता भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर स्टार सलामीवीर स्मृती मानधनाला (Smriti Mandhana) उपकर्णधार बनवण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना या संघात संधी मिळाली आहे.
भारतीय संघाची स्टार फलंदाज शेफाली वर्माला मात्र या संघातून वगळण्यात आले आहे. निवडकर्त्यांनी तिला इंग्लंड दौऱ्यावर संधी दिली होती, पण तिची कामगिरी निराशाजनक ठरली. या दौऱ्यात तिच्या बॅटमधून फक्त ३, ४७, ३१ आणि ७५ धावा निघाल्या, तर ऑस्ट्रेलिया-अ विरुद्ध तिने ३, ३ आणि ४१ धावा केल्या. तिच्या जागी, निवड समितीने स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांच्या जोडीवर विश्वास दाखवला आहे, ज्यांनी आपल्या जोरावर संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
A power packed #TeamIndia squad for the ICC Women’s Cricket World Cup 2025 💪
Harmanpreet Kaur to lead the 15 member squad 🙌🙌#WomenInBlue | #CWC25 pic.twitter.com/WPXA3AoKOR
— BCCI Women (@BCCIWomen) August 19, 2025
महिला विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज सारख्या फलंदाजांचा समावेश आहे. गोलंदाजी विभागात रेणुका सिंग, अरुंधती रेड्डी, राधा यादव आणि स्नेह राणा यांसारख्या प्रभावी खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय महिला संघाला अद्याप महिला विश्वचषकाचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. भारताने यापूर्वी दोनदा (२००५ आणि २०१७) महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती, परंतु दोन्ही वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते.
२०२५ च्या महिला विश्वचषकात एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. भारतीय महिला संघ आपला पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दिप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (यष्टीरक्षक), क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्रीकांत यादव, श्रीकांत यादव (विकेटकीपर). स्नेहा राणा.