
भारताचा श्रीलंकेवर एकतर्फी वरचष्मा
२००० पासून, भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघांमध्ये एकूण ३५ एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. रेकॉर्डनुसार, भारताने ३१ तर श्रीलंकेने ३ विजय मिळवले आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. या आकडेवारीवरून हे दिसून येते की स्पर्धा एकतर्फी राहिली असून भारताने वर्चस्व गाजवले आहे.
हेही वाचा : IND VS PAK : ‘बस झाली आता नाटकं! ACC च्या बैठकीत मोहसिन नक्वी यांच्यावर BCCI कडून होणार कारवाईची मागणी…
१६ सप्टेंबर २०१८ रोजी श्रीलंकेने एकदिवसीय इतिहासात भारताविरुद्ध दुसरा विजय मिळवला होता. जुलै २०२२ ते एप्रिल २०२५ पर्यंत सलग चार सामने गमावणाऱ्या श्रीलंकेने मे २०२५ मध्ये भारताविरुद्ध तिसरा विजय मिळवला होता. तथापि, मे २०२५ मध्ये खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेत दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले होते, जिथे भारताने श्रीलंकेला ९७ धावांच्या मोठ्या फरकाने परभूत करून आपली ताकद दाखवून दिली होती.
हेही वाचा : PAK vs SA : बाबर आझम आणि रिझवानचे होणार पुनरागमन! पाकिस्तानचा कसोटी संघ जाहीर, नसीम शाहला वगळले
भारतीय महिला संघ खालील प्रमाणे
प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, अमनजोत कौर, उमा छेत्री, श्री चरणी, राधा यादव, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर आणि अरुंधती रेड्डी.
श्रीलंकेचा महिला संघ खालील प्रमाणे
हसिनी परेरा, विश्मी गुणरत्ने, चमारी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), कविशा दिलहारी, देवमी विहंगा, इनोका रणवीरा, नीलाक्षी डी सिल्वा, सुगंधिका कुमारी, इमेशा दुलानी, प्रचिय्या कुंडिया, अचिंया कुमारी, इमेषा दुलानी. वत्सला बादलगे आणि मलकी मदारा.