फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आशिया कप 2025 चा फायनलचा सामना पार पडला, यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानचा पराभव करुन आशिया कप नावावर केला आहे. त्यानंतर आशिया कप 2025 च्या ट्राॅफीचा मोठा वाद पाहायला मिळाला. त्यानंतर आता भारताचा संघ मायदेशामध्ये परतला आहे तर पाकिस्तानचा संघ आशिया कप 2025 झाल्यानंतर कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दिसणार आहे. पाकिस्तानच्या संघाने या आशियाच्या स्पर्धेमध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये पाकिस्तानच्या संघामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवड समितीने आपला संघ जाहीर केला आहे. निवड समितीने १८ सदस्यीय संघाची निवड केली आहे. १२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ अंतर्गत पाकिस्तान आपली पहिली मालिका खेळेल. सध्या १८ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे, परंतु पहिल्या कसोटीपूर्वी काही खेळाडूंना वगळण्यात येईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.
शान मसूद कसोटी संघाचे नेतृत्व करत राहील. संघात तीन नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे: आसिफ आफ्रिदी, फैसल अक्रम आणि रोहेल नझीर. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, फलंदाज बाबर आझम आणि यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान संघात परतले आहेत, तर नसीम शाहला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. तथापि, नंतर संघात आणखी बदल अपेक्षित आहेत.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ चॅम्पियनशिपचा विजेता दक्षिण आफ्रिका १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पहिल्या कसोटीत पाकिस्तानशी सामना करेल, तर दुसरा कसोटी सामना २० ते २४ ऑक्टोबर दरम्यान रावळपिंडीच्या रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर तीन सामन्यांची टी-२० आणि एकदिवसीय मालिका होईल. मालिकापूर्व शिबिरासाठी, खेळाडू आजपासून बुधवार, ८ ऑक्टोबरपर्यंत रेड-बॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक अझर महमूद आणि एनसीए प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतील. नुकत्याच संपलेल्या टी-२० आशिया कपमध्ये खेळलेले खेळाडू ४ ऑक्टोबर रोजी संघात सामील होतील.
शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, आसिफ आफ्रिदी, बाबर आझम, फैसल अक्रम, हसन अली, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, रोहेल नजीर (यष्टीरक्षक), सलमान शाह, सल्मान शाह, साउद अली, साउद खान आणि शाहजीन आफ्रिदी