Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कालच्या मॅचमध्ये दिल्लीच्या रसिख सलामला डोळे दाखवणे पडले महागात; भरावा लागणार मोठा दंड; कठोर शब्दांमध्ये फटकार; कर्णधार ऋषभ पंतसुद्धा बसला गप्प

गुजरातविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज रसीख सलाम दार याला जोरदार फटकारले आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात विकेट घेतल्यानंतर रसिकने आक्रमकपणे सेलिब्रेशन केले होते. रसिक सलाम हा आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ नुसार दोषी आढळला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 25, 2024 | 04:08 PM
IPL 2024: It was costly for Rasikh Salam to get his eyes exposed, he was reprimanded severely, even the captain could not save him

IPL 2024: It was costly for Rasikh Salam to get his eyes exposed, he was reprimanded severely, even the captain could not save him

Follow Us
Close
Follow Us:
नवी दिल्ली : गुजरात टायटन्सविरुद्ध IPL 2024 सामन्यात विकेट घेतल्यावर आक्रमक सेलिब्रेशन केल्याबद्दल दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज रसीख सलाम दारला फटकारण्यात आले आहे. त्याला लागोपाठ साई किशोरने दोन षटकार ठोकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने साई किशोरला क्लिनबोल्ड केले होते, यानंतर त्याने ज्या पद्धतीने रिअॅक्शन दिली होती, ते पाहून कोणालाही ते न रुचणार होते. त्याचे डोळ्यांचे हावभाव सांगत होते, हेच कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्याला जोरदार फटकार लावण्यात आली आहे.
४४ धावांत तीन बळी
यादरम्यान, रसिक हा आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत लेव्हल 1 गुन्ह्यासाठी दोषी आढळला होता, जो दुसऱ्या खेळाडूला चिथावणी देणारी भाषा किंवा कृती किंवा हावभाव वापरण्याशी संबंधित आहे. रसिकने चार षटकांत ४४ धावांत तीन बळी घेतले.
ऋषभ पंतची शानदार फलंदाजी
या सामन्यात दिल्लीकडून कर्णधार ऋषभ पंतने शानदार फलंदाजी केली. पंतने 88 धावांसाठी 43 चेंडू खेळले. या डावात त्याने षटकारही मारला. पंतच्या दमदार फलंदाजीमुळे दिल्लीचा संघ निर्धारित 20 षटकांत 224 धावा करण्यात यशस्वी ठरला.
गुजरातविरुद्धच्या या सामन्यात अष्टपैलू अक्षर पटेलला फलंदाजीसाठी बढती देण्यात आली. अक्षरनेही संपूर्ण जबाबदारी स्वीकारून आपल्या संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून सोडवलेच शिवाय उत्कृष्ट अर्धशतकी खेळीही खेळली. अक्षर पटेलने 43 चेंडूत 66 धावा केल्या. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने 26 धावांचे योगदान दिले.

Web Title: Ipl 2024 it was costly for rasikh salam to get his eyes exposed he was reprimanded severely even captain could not save him nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2024 | 04:07 PM

Topics:  

  • Arun Jaitley Stadium
  • Delhi Capitals

संबंधित बातम्या

मिचेल स्टार्कचा पगार किती कापणार? दिल्ली कॅपिटल्सला सोडल्यावर होणार कोट्यवधींचे नुकसान
1

मिचेल स्टार्कचा पगार किती कापणार? दिल्ली कॅपिटल्सला सोडल्यावर होणार कोट्यवधींचे नुकसान

Indo pak war : कोलकाता आणि जयपूरनंतर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम उडवण्याची धमकी, पोलिस सज्ज
2

Indo pak war : कोलकाता आणि जयपूरनंतर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम उडवण्याची धमकी, पोलिस सज्ज

IPL २०२५ : प्लेऑफची लढाई होणार रोमांचक, पहिल्यांदाच एखाद्या फ्रँचायझी विजेती होण्याची शक्यताच जास्त.. 
3

IPL २०२५ : प्लेऑफची लढाई होणार रोमांचक, पहिल्यांदाच एखाद्या फ्रँचायझी विजेती होण्याची शक्यताच जास्त.. 

एक चूक LSG ला पडली महागात; ऋषभ पंतांच्या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्स ठरली विजयी….
4

एक चूक LSG ला पडली महागात; ऋषभ पंतांच्या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्स ठरली विजयी….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.