IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट म्हणाला की रोहित हा एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि संघाला विक्रमी सहावे आयपीएल जेतेपद जिंकण्यात तो मोठी भूमिका बजावेल. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चार विकेट्स घेत मुंबई इंडियन्सच्या सलग चौथ्या विजयात बोल्टने महत्त्वाची भूमिका बजावली. सनरायझर्सना आठ बाद १४३ धावांवर रोखल्यानंतर, मुंबईने रोहितच्या ४६ चेंडूत ७० धावांच्या मदतीने १५.४ षटकांत लक्ष्य गाठले. सामन्यानंतर पत्ररिषदेत बोल्टने सांगितले की, संपूर्ण मुंबई संघात जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत आणि रोहितला कोणत्याही ओळखीची गरज नाही.
हेही वाचा : Sunil Gavaskar यांचा याहून गोंडस व्हिडीओ कुठे पाहायला मिळणार! मास्टर ब्लास्टरची ‘चंपक’सोबत मस्ती
प्रत्येकजण संघाच्या विजयात योगदान देऊ इच्छितो पण रोहित गेल्या काही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करत आ हे हंगामातील उवरित सामन्यांमध्ये तो आमच्यासाठी मोठी भूमिका बजावेल. हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदाचे कौतुक करताना बोल्टने म्हटले की, हार्दिक हा एक उत्साही क्रिकेटपटू आहे आणि तो खूप प्रतिभावान देखील आहे. तो एक उत्कृष्ट कर्णधार आहे आणि आघाडीवरून नेतृत्व करतो. तो माझ्या आवडत्या भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे, त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली खेळणे हा एक उत्तम अनुभव आहे.
पहिल्या पाचपैकी चार सामन्यांत पराभव पत्करल्यानंतर, मुंबईने सलग चार सामने जिंकून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत परंतु बोल्ट फार पुढे जाण्याचा विचार करत नाही. सुरुवातीला आम्हाला लय सापडली नाही पण सलग चार विजयांनंतर आम्ही ती कमतरता भरून काढली. आमचा संघ चांगला खेळत आहे आणि आम्हाला तो पुढेही चालू ठेवायचा आहे. परिस्थिती बदलण्यास जास्त वेळ लागत नाही म्हणून आपण जास्त पुढचा विचार करत नाही आहोत. स्पर्धेत अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे.
हेही वाचा : RCB vs RR : जोश हेझलवुड ठरला आजच्या सामन्याचा हिरो! राजस्थानला बंगळुरूने 11 धावांनी केलं पराभूत
पंड्या या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबादला सात विकेट्सनी हरवून सलग चौथा विजय मिळवणारा मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, संघ योग्य दिशेने वाटचाल करत आहे याचा मला आनंद आहे. ट्रेंट बोल्टच्या चार विकेट्सच्या मदतीने सनरायझर्सना आठ बाद १४३ धावांवर रोखल्यानंतर, रोहित शर्माच्या सलग दुसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने १५.४ षटकांत विजय मिळवला. जिंकणे चांगले वाटते. संघ योग्य दिशेने वाटचाल करत आहे हे पाहून मला आनंद होत आहे. मला वाटतं जेव्हा सर्व खेळाडू फॉर्ममध्ये असतील तेव्हा आपण वर्चस्व गाजवू. दीपक आणि बोल्टने गोलंदाजीत तर रोहित आणि सूर्यकुमारने फलंदाजीत काम केले. हा एक शानदार विजय होता.