फोटो सौजन्य - IndianPremierLeague
Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals match report : बंगळुरू आणि राजस्थान यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात बंगळुरूच्या संघाने या सीझनचा पहिला विजय घरच्या मैदानावर नावावर केला आहे. तर राजस्थान रॉयल्सचा हा सीझनचा सातवा पराभव आहे आणि या पराभवानंतर जवळजवळ राजस्थानचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला बंगळुरूने 11 धावांनी पराभूत केले. आजच्या सामन्यांमध्ये रियान परागने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिले फलंदाजी करत बंगळुरूच्या संघाने विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांच्या जोरावर २०५ धावा केल्या. आजच्या सामन्यात दोन्ही संघाची कशी कामगिरी राहिली यावर एकदा नजर टाका.
राजस्थानच्या फलंदाजीचे सांगायचे झाले तर यशस्वी जैस्वाल याने संघासाठी ४९ धावांची खेळी खेळली. यामध्ये त्याने ३ षटकार आणि ७ चौकार मारले. राजस्थानचा युवा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने संघासाठी १२ चेंडूंमध्ये १६ धावा केल्या यामध्ये त्याने २ षटकार मारले. नितीश राणा आज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. याने २२ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. रियान परागने आणखी एकदा निराशाजनक कामगिरी केली. आज त्याने १० चेंडूंमध्ये २२ धावा केल्या आणि कृणाल पंड्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. या सीझनमध्ये रियान परागचा फॉर्म सातत्याने खराब राहिला आहे.
Match 42. Royal Challengers Bengaluru Won by 11 Run(s) https://t.co/mtgySHgAjc #RCBvRR #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2025
ध्रुव जुरेलने संघासाठी चांगली खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. त्याने संघासाठी ३४ चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या. आणि त्यानंतर १९ व्या ओव्हरमध्ये जोश हेझलवूड याने संघासाठी दोन विकेट घेतले आणि सामना बंगळुरूच्या दिशेने वळवला. हेटमायर त्याचबरोबर राजस्थानची इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आले शुभम दुबे देखील संघासाठी मोठी कामगिरी कर शकला नाही.
Sunil Gavaskar यांचा याहून गोंडस व्हिडीओ कुठे पाहायला मिळणार! मास्टर ब्लास्टरची ‘चंपक’सोबत मस्ती
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनी अर्धशतक ठोकले. यामध्ये विराट कोहलीने संघासाठी ४२ चेंडू खेळले आणि त्याने ७० धावा केल्या. यात कोहलीने २ षटकार आणि ८ चौकार मारले. पडीक्कलने संघासाठी ५० धावांची खेळी खेळली यामध्ये त्याने ३ षटकार आणि ४ चौकार मारले. सलामीवीर फलंदाज सॉल्टने संघासाठी २३ चेंडू खेळले आणि २६ धावा केल्या. टीम डेव्हिडने २३ धावा केल्या. रजत पाटीदार आज फेल ठरला तर जितेश शर्मा याने १० चेंडूंमध्ये २० धावा केल्या.
बंगळुरूच्या गोलंदाजीबद्दल नजर टाकली तर भुवनेश्वर कुमार याने संघासाठी १ विकेट घेतला. तर जोश हेझलवूड याने संघासाठी ४ विकेट्स घेतले. यामध्ये त्याने ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, सिमरोन हेटमायर आणि जोफ्रा आर्चर यांना बाहेरचा रस्ता दाखवला. फिरकी गोलंदाज कृणाल पंड्याने आणखी एकदा चमकदार कामगिरी केली त्याने संघासाठी २ विकेट्स घेतले. यश दयालच्या हाती एक विकेट शेवटच्या ओव्हरमध्ये लागला आहे.