फोटो सौजन्य - Mumbai Indians
IPL 2025 गुणतालिका : आयपीएल 2025 चा हा सिझन आता शेवटच्या टप्प्यात आहे, आज या सिझनचा 56 वा सामना खेळवला जाणार आहे. या सिझनमध्ये 10 संघ सामील झाले होते यामध्ये चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीमधुन बाहेर झाला आहे. तर सनराइझर्स हैदराबादचा संघ देखील आता प्लेऑफमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे आता प्लेऑफच्या शर्यतीत फक्त 8 संघ शिल्लक आहेत. यामध्ये आता पहिल्या चार मध्ये कोणते संघ सहभागी होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. सध्या गुणतालिकेची स्थिती काय आहे, यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गुणतालिकेत पहिल्या स्थानावर रॅायल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आहे. बंगळुरूच्या संघाने आतापर्यत 11 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 8 सामन्यात विजय मिळाला आहे तर 3 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा संघ आहे. संघाने 11 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 7 सामन्यात विजय मिळाला आहे तर 3 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मुंबई इंडियन्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. संघाचे सध्या 14 गुण आहेत.
#MI have consecutive wins under their belt, but Ab Asli Race Shuru! 🏁
With #MI are riding high on momentum, will they defeat #GT tonight and strengthen their Top 2 charge? 💪🏻#IPLRace2Playoffs 👉 #MIvGT | 6th MAY, 6:30 PM on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, Star Sports 2,… pic.twitter.com/yXgfCNCPlf
— Star Sports (@StarSportsIndia) May 6, 2025
पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना मंगळवारी गुजरात टायटन्सशी होणार आहे. जर मुंबईने हा सामना जिंकला तर ते प्लेऑफमध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित करेल. संघाचे सध्या ११ सामन्यांत सात विजयांसह १४ गुण आहेत आणि ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. जर संघ जिंकला तर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मागे टाकेल आणि अव्वल स्थानावर पोहोचेल कारण त्याचा नेट रन रेट सर्वोत्तम आहे.
SRH vs DC : इशान किशनच्या नावावर नवा रेकॅार्ड! IPL च्या इतिहासात असे पहिल्यांदाच
हार्दिक पंड्याच्या संघाने जिंकल्यास सर्वात मोठा पराभव लखनौ सुपर जायंट्सकडून होईल, जे सध्या १० गुणांसह पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. जर मुंबईने आजचा सामना जिंकला तर इतिहासात पहिल्यांदाच एकाच हंगामात सलग सात सामने जिंकण्याची ही संघाची संधी असेल. या संघाने २००८ आणि २०१७ मध्ये दोनदा असे केले आहे, जेव्हा त्यांनी सलग सहा सामने जिंकले होते. पण आजपर्यंत मुंबईने कधीही सलग सात सामने जिंकलेले नाहीत.
चौथ्या स्थानावर गुजरात टायटन्सचा संघ आहे. गुजरातचे 10 गुण आहेत, पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिट्ल्सचा संघ आहे. संघाचे सध्या 13 गुण आहेत.