फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad
इशान किशनच्या नावावर नवा विक्रम : काल सनराइझर्स हैदराबाद विरुध्द दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना झाला पण सामना पुर्ण खेळवण्यात आला नाही. कालच्या सामन्यात हैदराबादने नाणेफेेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये कालच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या संघाने कौतुकास्पद कामगिरी केली. तर दिल्लीचे पहिल्या पाच फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती. कालच्या सामन्यात सनराइझर्स हैदराबादचा विजय जवळजवळ पक्का होता पण पावसाने त्यांचा विजय हिसकावुन घेतला.
हैदराबादच्या संघाने कालच्या सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाला 133 धावांवर रोखले होते. यामध्ये इशान किशनने कालच्या सामन्यात विकेटकिपिंग केली आणि सर्वांनाच चकित केले. कालच्या सामन्यात इशान किशनने त्याच्या नावावर नवा विक्रम केला आहे. इशान किशनने कालच्या सामन्यात पहिल्या चार फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. असे आयपीएलच्या इतिहासामध्ये कधीच झाले नाही. सनराइझर्स हैदराबाद विरुध्द दिल्ली कॅपिटल्स सामन्यात इशान किशनने चार खेळाडूंचे कॅच घेतले. यामध्ये त्याने करूण नायर, फाफ डुप्लेसी, अभिषेक पोरेल आणि केएल राहूल यांना बाद केले.
Today is 1st ever time in IPL History
All Top 4 batters catches taken by Same player!Ishan Kishan🗿#SRHvDC pic.twitter.com/7iGE8hjdEN
— Cricket Max Masala (@Cricket_CMM) May 5, 2025
इशान किशनने एकाच खेळाडूने टॉप ४ फलंदाजांचे झेल घेतले हे आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच झाले आहे. सनराइझर्स हैदराबाद विरुध्द दिल्ली कॅपिटल्स या सामन्याचा पहिला डाव झाला आणि त्यानंतर राजीव गांधी मैदानावर मुसळधार पाऊस झाला. या सामन्यात फक्त दिल्ली कॅपिटल्स संघ फलंदाजी करू शकला. तथापि, पावसामुळे सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आले. सामना रद्द झाल्यामुळे सनरायझर्स संघही या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाला २० षटकांत ७ गडी गमावून फक्त १३३ धावा करता आल्या.
दिल्लीकडून फलंदाजी करताना आशुतोष शर्माने २६ चेंडूत ४१ धावा केल्या आणि ट्रिस्टन स्टब्सनेही ४१ धावा केल्या. हैदराबादच्या मजबूत फलंदाजीसमोर हे लक्ष्य खूपच कमी मानले जात असल्याने सनरायझर्स हैदराबादला हा सामना सहज जिंकता आला असता, परंतु पावसाने हैदराबादच्या सर्व आशा धुळीस मिळवल्या. सामना रद्द झाल्यामुळे, सनरायझर्स हैदराबाद स्पर्धेतून बाहेर पडला आणि आयपीएल २०२५ मधून बाहेर पडणारा तिसरा संघ बनला.
दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना पंजाब किंग्स विरूध्द सामना खेळवला जाणार आहे, हा सामना 8 मे रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन धर्मशाला येथे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर करण्यात आले आहे.