फोटो सौजन्य - BCCI Domestic सोशल मीडिया
मुशीर खान : दुलीप ट्रॉफीचे सामने ५ सप्टेंबरपासून सुरु झाले आहेत, यामध्ये भारतीय क्रिकेट संघामधील अनेक अनुभवी खेळाडूंचा सहभाग आहे. त्याचबरोबर अनेक युवा खेळाडूंना सुद्धा दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये भारताचा दमदार खेळाडू सरफराज खान यांचा लहान भाऊ मुशीर खान याला सुद्धा संघामध्ये स्थान मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी मुशीर खान याने U-१९ संघामध्ये चांगली कामगिरी केली होती. आता सध्या तो इंडिया बी संघामधून खेळत आहे. यामधून त्याने दमदार कामगिरी करत शतक ठोकलं त्यामुळे त्याला आता टीम इंडियाचा मोठा दावेदार म्हणून पाहिले जात आहे. असे मानले जाते की मुशीर खान लवकरच त्याचा मोठा भाऊ सरफराज खानप्रमाणे टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहे.
मीडियाच्या माहितीनुसार असे म्हंटले जात होते की, इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये मुशीर खानवर किती बोली लागणार? यावर चर्चा सुरु आहेत. तथापि, ज्या संघांना लिलावात मुशीर खानचा समावेश करायचा आहे त्या संघांवर एकदा नजर टाका.
चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या जागी बदलण्याच्या शोधात आहे. माहीच्या जागी मुशीर खान चेन्नई सुपर किंग्जचा भाग होऊ शकतो. जर चेन्नई सुपर किंग्सने मुशीर खानला जोडले तर तो मधल्या फळीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
पंजाब किंग्सला मधल्या फळीत एका चांगल्या फलंदाजाच्या शोधात आहे. यावेळी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाला मधल्या फळीत चांगल्या फलंदाजासाठी झगडावे लागले. मात्र, आयपीएल लिलावात मुशीर खान पंजाब किंग्जसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. आयपीएल लिलावात पंजाब किंग्ज मुशीर खानवर बऱ्यापैकी पैसे खर्च करू शकतात, असे मानले जाते.
मुंबई इंडियन्स २०२४ च्या आयपीएलमध्ये वादामध्ये सापडला. त्याचबरोबर आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला मुंबई इंडियन्स मुशीर खानवर बोली लावू शकतो. मुशीर खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. मुशीर खान देशांतर्गत क्रिकेटमधील एक उगवता स्टार आहे. आयपीएल लिलावात मुशीर खानवर पैशांचा पाऊस पडू शकतो.